स्वप्नातील घरे स्वप्नातच मिळणार ; पंतप्रधान `फेककुल` योजना, एमआयएमची पोस्टरबाजी

पोस्टरवर स्वप्नातील घरे स्वप्नातच मिळणार, अशी टीका देखील करण्यात आली आहे. (Aimim, Aurangabad)
Aimim, Aurangabad
Aimim, AurangabadSarkarnama

औरंगाबाद : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मतदारसंघातील पंतप्रधान घरकुल योजनेतील भोंगळ कारभाराचा भांडाफोड करत लोकसभेत आवाज उठवला. (Mp Imtiaz Jalil) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फक्त गरीबांना स्वप्नच दाखवतात, असा आरोप करत इम्तियाज जलील यांनी जिल्ह्यातील घरकुल योजनेची (Aurangabad) दशा दाखवणारी आकडेवारी समोर आणली होती. (PM Modi) त्यानंतर आता एमआयएमच्या वतीने शहरात ठिकठिकाणी पोस्टरबाजी करून पंतप्रधान घरकुल योजनेचा कारभार चव्हाट्यावर आणला जात आहे.

खासदार इम्तियाज जलील यांनी काही दिवसांपुर्वी पत्रकार परिषद घेत जिल्ह्यातील पंतप्रधान घरकुल योजनेची सद्यस्थिती, योजनेसाठी आलेले एकूण अर्ज, मंजुर झालेले आणि प्रत्यक्षात किती जणांना घरे मिळाली याची माहिती दिली होती. पंतप्रधान मोदी हे गरीबांना फक्त स्वप्न दाखवतात असा आरोप करत उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात या घरकूल योजनेचा भांडाफोड करणार असल्याचे जाहीर केले होते.

आता त्यांच्या पक्षाच्या वतीने शहराच्या विविध भागात पंतप्रधान घरकुल योजनेला फेककुल योजना असे म्हणत पोस्टर लावण्यात आले आहेत. या पोस्टरवर स्वप्नातील घरे स्वप्नातच मिळणार, अशी टीका देखील करण्यात आली आहे. भाजपने पंतप्रधान घरकुल योजना रखडण्यास ठाकरे सरकार, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, महापालिका प्रशासक जबाबदार असल्याचा आरोप करत तेच योजनेसाठी जागा देत नसल्याची तोफ डागली होती.

Aimim, Aurangabad
काॅंग्रेस नगरसेवकाला अटक होताच आमदार प्रज्ञा सातव पोलीस ठाण्यात धडकल्या

तर इम्तियाज जलील हे शिवसेनेचे बी टीम म्हणून काम करत असल्याचा आरोप देखील भाजपने केला होता. त्यानंतर शहरात लागलेल्या या पोस्टरमुळे राजकीय संघर्ष अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, पंतप्रधान घरकुल योजनेला गती देण्यासाठी दिल्लीत बोलावण्यात आलेल्या बैठकीला महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय हे हजर राहणार असून शहरालगतच्या अनेक गावात या योजनेसाठी जागा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव ते देणार असल्याची देखील माहिती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com