Rajesh Tope : शरद पवारांच्या जादूच्या कांडीमुळे अडीच वर्षाची सत्ता बोनसच होती...

नवे सरकार सत्तेवर आले असले तरी त्यात मोठा घोळ आणि पेच आहे. शिंदे गटाला एखाद्या पक्षात विलीन व्हावे लागेल किंवा स्वःताचा पक्ष काढावा लागेल. (Rajesh Tope)
Ncp Leader Sharad Pawar-Rajesh Tope
Ncp Leader Sharad Pawar-Rajesh TopeSarkarnama

औरंगाबाद : राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटायला लागल्या आहेत. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या सत्ता संघर्षावर अखेर दोन दिवसांपुर्वी पडदा पडला. मुंबईत ठाण मांडून बसलेले सगळ्याच पक्षाचे आमदार, माजी मंत्री, नेते आपापल्या मतदारसंघात परतले आहेत. माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) आपल्या मतदारसंघातील विविध विकास कामांच्या उद्धटानासाठी जात आहेत. यावेळी बोलतांना त्यांनी सत्ता गेल्याचे दुःख नसल्याचे म्हटले आहे.

शरद पवार (Sharad Pawar) यांच्या जादूच्या कांडीमुळे मिळालेली अडीच वर्षांची सत्ता ही बोनसच होती, असेही ते मिश्किलपणे म्हणाले. पुढील पंचवीस वर्ष राज्यात महाविकास आघाडीचीच सत्ता आणि उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री असतील असा दावा शिवसेनेकडून केला जात होता. (Marathwada) तर राष्ट्रवादीचे नेते पुन्हा येईन म्हणणाऱ्या फडणवीसांना आम्ही परत येऊ देत नसतो, असे म्हणत होते. मात्र हे दावे आणि आव्हाने अडीच वर्षातच गळून पडले.

शिवसेनेतील ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड केले आणि राज्यात सत्तांतर होऊन शिंदे मुख्यमंत्री झाले. अर्थात या सत्ता नाट्याचे करते करविते हे फडणवीसच होते हे स्पष्ट झाले. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी हे सरकार सहा महिन्यात पडेल आणि मध्यावधी निवडणूका होतील, अशी भविष्यावणी केली आहे. त्यानंतर माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात बोलातंना गेलेल्या सत्तेचे दुःख नसल्याचे सांगितले.

Ncp Leader Sharad Pawar-Rajesh Tope
तो 'माजी' सरकारी भाचा, 'Mr. India' झाला आहे का? नितेश राणेही सरदेसाईंच्या शोधात

ते म्हणाले, सत्ता येत असते, सत्ता जात असते त्याचे दुःख मानायचे नसते. आपण सर्व सामान्याची कामे जशी सत्ता असतांना करत होतो तशीच आता विरोधी पक्षात असतांना देखील करत राहायची. नाहीतरी अडीच वर्ष मिळालेली राज्यातील सत्ता ही आपल्यासाठी बोनसच होती. शरद पवारांनी केलेल्या जादूच्या कांडीमुळे ती मिळाली होती. पवार साहेब अधूनमधून अशी जादू करत असतात.

अडीच वर्षाच्या सत्तेत आपण सर्वसामान्यांसाठी जे करता येईल ते केले, यापुढे देखील करत राहू. नवे सरकार सत्तेवर आले असले तरी त्यात मोठा घोळ आणि पेच आहे. शिंदे गटाला एखाद्या पक्षात विलीन व्हावे लागेल किंवा स्वःताचा पक्ष काढावा लागेल. पण यापैकी त्यांनी अद्याप काहीच केलेले नाही. त्यामुळे या सरकारमधील त्रांगड बरेच दिवस चालेल, असा अंदाजही टोपे यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com