Sillod Nagar Parishad: सत्तारांच्या सिल्लोड नगर परिषदेचे २७ लाखांचे वीज बील थकले, महावितरणने दिली नोटीस..

Mahavitaran Notice To Sillod Nagar Parishad: नगर परिषदेने आता मालमत्ता कर वसुलीसाठी वॉर्डनिहाय अधिकारी कर्मचाऱ्यांची समिती नेमली आहे.
Municipal Council News
Municipal Council NewsSarkarnama
Published on
Updated on

Abdul Sattar News: राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांची गेल्या पंधरा वर्षापासून एकहाती सत्ता असलेल्या सिल्लोड नगर परिषदेला महावितरण कंपनीने नोटीस बजावली आहे. २७ लाख ४२ हजार ४७० रुपयांच्या थकीत बीलाच्या वसुलीसाठी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. पंधरा दिवसात थकीत बीलाचा भरणा केला नाही, तर नगर परिषद व परिसराचा विद्युत पुरवठा खंडीत करण्याचा इशारा देखील नोटीसीद्वारे देण्यात आला आहे.

Municipal Council News
G. Shrikant News : कर्मचाऱ्याला शिवीगाळ करणाऱ्याचे घर गाठत प्रशासकांनी दिली तंबी..

महावितरणची नोटीस मिळताच आता नगर परिषदेने नागरिकांना नळपट्टी, मालमत्ता कराचा तात्काळ भरणा करण्याचे आवाहन केले आहे. (Sillod City Council) सिल्लोड नगर परिषदेच्या माध्यमातून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरूवात केल्यानंतर अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे सलग तीनवेळा आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले. राज्यमंत्री आणि त्यानंतर कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची त्यांना संधी मिळाली.

उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री राहिलेल्या सत्तारांना शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेटपदी बढती देण्यात आली. (Marathwada) राज्याच्या कृषी सारख्या महत्वाच्या खात्याचे मंत्री होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. आता त्यांच्याकडे अल्पसंख्याक विभागाचा पदभार आहे. राज्यात नेतृत्व करत असतांना सत्तार यांचे लक्ष कायम नगर परिषदेच्या कारभाराकडे देखील राहिले आहे. त्यांच्या घरातील दोन सदस्यांनी याआधी नगराध्यक्ष म्हणून कारभार पाहिला आहे. सत्तार यांच्या पत्नी आणि मुलगा हे दोघे नगर परिषदेचे अध्यक्ष होते.

आता देखील सत्तार समर्थक महिलाच नगराध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. बहुमतासह सत्ता ताब्यात असतांना आणि अब्दुल सत्तार हे राज्यात मंत्री असतांना नगरपरिषदेचे वीज बील थकल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आता हे थकीत वीज बील पंधरा दिवसात भरले नाही, तर नगरपरिषदेवर मोठी नामुष्की ओढावण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेवून नगर परिषदेने आता नळपट्टी, मालमत्ता कराच्या वसुलीसाठी विशेष मोहिम हाती घेतली आहे. शहरातील मालमत्ता धारकांनी आपल्याकडील घरपट्टी, नळपट्टी सारखे कर भरून नगर परिषदेस सहकार्य करावे, असे अवाहन मुख्याधिकारी सय्यद रफिक यांनी केले आहे.

तसेच थकबाकी येत्या १५ दिवसांत भरली नाही तर नळ कनेक्शन कट करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील दिला आहे. नगर परिषदेने आता मालमत्ता कर वसुलीसाठी वॉर्डनिहाय अधिकारी कर्मचाऱ्यांची समिती नेमली आहे. त्यामुळे सिल्लोडकरांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. महावितरणने साडेसत्तावीस लाखांच्या थकबाकीसाठी नोटीस बजावली आहे. ही थकबाकी कधीपासून आहे हे समजू शकलेले नाही. परंतु गळ्याशी आल्यानंतर नगरपरिषदेला जाग आली का? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थितीत केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com