Beed : राज्यातील सत्तांतरानंतर भाजपने खासगी प्रशासक मंडळ नेमणुकीच्या हालचाली केल्या. मात्र, संचालक मंडळातील नावांवर भाजप नेत्यांचे एकमत झाले नव्हते. परिणामी, भाजपच्या खेळीची नाव पाण्यात वाहून गेली. आता राष्ट्रवादीने सत्तेत एन्ट्री करताच पुन्हा बीडमध्ये अविनाश पाठक यांच्या अध्यक्षतेखालील चार सदस्यीय प्रशासक मंडळाची नेमणूक केली.
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत बॅकफुटवर गेलेल्या भाजपने सत्तेत आल्यानंतर खासगी प्रशासक मंडळाची नेमणूक करण्याचे प्रयत्न अंतर्गत दुमतामुळे फसले. मात्र, राष्ट्रवादीने सत्तेत एंट्री करताच द्विसदस्यीय प्रशासक मंडळात बदल करुन आता पुन्हा मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांच्या अध्यक्षतेखालील चार सदस्यीय प्रशासक मंडळ आणले आहे.
लातूर येथील विभागीय सहनिबंधक (सहकारी संस्था) एस. आर. नाईकवाडी यांनी शुक्रवारी तसे आदेश काढले. यापूर्वीच्या जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था समृत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विशेष लेखा परीक्षक (वर्ग एक सहकारी संस्था) बी. यु. भोसले होते. आता श्री. पाठक यांच्या अध्यक्षतेखाली समृत जाधव यांच्यासह श्री. भोसले तसेच औसा (जि. लातूर) येथील सहाय्यक निबंधक अशोक कदम यांचा समावेश आहे.
दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवर अनेक वर्षे भाजपची सत्ता होती. तत्कालीन प्रशासकाच्या कालावधीत दिडशेंवर गुन्हेही नोंद झाले. सहा वर्षानंतर निवडणुकीत पुन्हा भाजपने सत्ता मिळविली. मात्र, संचालक मंडळाच्या निवडीसाठी दोन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत तालुका सेवा सोसायटी मतदारसंघातील सर्वच उमेदवारांचे अर्ज बाद झाले. उर्वरित आठ संचालकांच्या निवडीत राष्ट्रवादी(NCP)ने बाजी मारली.
कोरम संख्या अपूर्ण राहिल्याने हे संचालक मंडळ बरखास्त करुन बॅंकेवर त्यावेळी अपर आयुक्त असलेले अविनाश पाठक यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळ नेमण्यात आले हेाते. सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघात भाजप(BJP)ची असलेली मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी राष्ट्रवादीने सत्तेत असताना ही खेळी खेळली होती. दरम्यान, या प्रशासक मंडळाला पुन्हा मुदतवाढीनंतर सहा महिन्यांपूर्वी पुन्हा द्विसदस्यीय प्रशासक मंडळाची नेमणूक करण्यात आली होती. (Latest Marathi News)
दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत अधिकाऱ्यांच्या नेमणुका करताना सिनॅअरिटी डावलण्यात आलेली आहे. अनेक महत्वाची पदे दुय्यम अधिकाऱ्यांकडे आहेत. त्यामुळे आपला कनिष्ठच वरिष्ठ पदांवर बसल्याने नाराजी आणि मॉरल हे मुद्दे समोर आलेले आहेत.
(Edited By Deepak Kulkarni)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.