Asaduddin Owaisi News : समान नागरी कायदा मुस्लिमांसाठीच नाही, इतरांसाठीही धोकादायक..

Marathwada : मुस्लिमांच्या आड सत्ताधारी हे आदिवासी, बौद्ध आणि इतर मागासवर्गीयांच्या धार्मिक अधिकारावर गदा आणू पाहात आहेत.
Asaduddin Owasi News
Asaduddin Owasi News Sarkarnama
Published on
Updated on

Aimim : गेल्या अनेक वर्षांपासून भारतात विविध जाती धर्माचे नागरिक गुण्यागोविंदाने राहत आहेत. मात्र मुस्लिमांना लक्ष्य करत देशांमध्ये जातीय राजकारण केले जात आहे. (Asaduddin Owaisi News) समान नागरी कायद्यामुळे केवळ मुस्लिमच नाही, तर हिंदू धर्मीयांसह इतर जाती-धर्माच्या नागरिकांना देखील त्रास होणार आहे, असा दावा एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदोद्दीन ओवेसी यांनी केला.

Asaduddin Owasi News
Beed Ncp Crisis News : इकडे मंत्रीपद, तिकडे काय ? मेरे पास शरद पवार है...

छत्रपती संभाजीगर येथे आयोजित समान नागरी कायदा विषायवार आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. (Asaduddin Owaisi) एक देश दोन कायदे कसे चालतील, असे सांगत देशाचे पंतप्रधान हे नागरिकांचे दिशाभूल करत असल्याचा आरोपही ओवेसी यांनी केला.

गेल्या ४० वर्षांपासून त्याकाळचा जनसंघ आणि आताचा भाजप हा एकाच अजेंड्यावर काम करत आला आहे. यात (BJP) भाजप मुस्लिमांना समोर करत देशांमध्ये जातीय राजकारण करत आले आहे. देशातील विविधतेने नटलेला आपला देश आहे. (AIMIM) यात प्रत्येक राज्यातील आपापले स्वतंत्र असे कायदे आहेत. त्याच प्रमाणे देशात विविध समाजाचे तसेच धर्माच्या पारंपारिक रितीरिवाजाप्रमाणे आचरण करण्याचे राज्यघटनेने अधिकार दिले आहेत.

मात्र या कायद्यात बदल म्हणजे देशातील विविध धर्म, जातींच्या परंपरा, लग्न पद्धती, संपत्ती हस्तांतरणाच्या पद्धती, दत्तक विधानासह धार्मिक अनुष्ठानाच्या पद्धती धोक्यात येऊ शकतात. केवळ मुस्लिमांच्या आड सत्ताधारी हे आदिवासी, बौद्ध आणि इतर मागासवर्गीयांच्या धार्मिक अधिकारावर गदा आणू पाहात असल्याचेही ओवेसी म्हणाले.

निवडणुकीपुर्वी तिहेरी तलाक येतो, कधी सीएए, एनआरसी येतो तर कधी हिजाब येतो. आता समान नागरी कायदाच्या माध्यमातून निवडणूक जिंकण्याचा हा प्रयत्न असल्याचे इम्तियाज जलील म्हणाले. या चर्चासत्रात शिख धर्माचे ग्रंथी खडकसिंगजी, बिशप रेव्हस मधुकर कसाब, भन्ते सत्यपाल, भन्ते बुद्धपाल, आमदार मुफ्ती ईस्माईल, धनगर समाजाचे संजय फटांगळे, गोपाल बच्छिरे, चुन्नीलाल जाधव यांच्यासह एजाज जैदी, अॅड. खिजर पटेल, मौलाना कवी फलाही, हाफिज अब्दुल अजीम आदींची उपस्थिती होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com