Ranjit Kasale : 'ईव्हीएम'वरून प्रतिमा मलीन करतो काय? बडतर्फ कासलेविरुद्ध निवडणूक आयोगानं उचललं मोठं पाऊल

Election Commission FIR against dismissed PSI Ranjit Kasale Beed Police claims EVM tampering : बीड सायबर विभागातील बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक रणजीत कासले विरोधामध्ये निवडणूक आयोगाने कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
Ranjit Kasle
Ranjit KasleSarkarnama
Published on
Updated on

EVM tampering case : बीड पोलिस दलातील बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक रणजित कासलेविरुद्ध निवडणूक आयोग अ‍ॅक्शन मोडवर आलं आहे. निवडणुकीत ईव्हीएम मशीनपासून दूर राहण्यासाठी आमदार धनंजय मुंडे यांच्या माणसांकडून आपल्या बँक खात्यावर 10 लाख रुपये टाकण्यात आल्याचा दावा रणजित कासले याने केला होता.

हाच दावा आता कासलेच्या अंगलट आला आहे. निवडणूक आयोगाने कासलेविरुद्ध कायदेशीर कारवाई करत परळी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

बीड (BEED) जिल्ह्यातील नायब तहसीलदार अण्णा वंजारे यांनी परळी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कासले याने केलेल्या दाव्यामुळे निवडणूक आयोगाची प्रतिमा मलीन झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अण्णा वंजारे यांनी फिर्यादीत परळी विधानसभा निवडणुकीचा घटनाक्रम दिला आहे.

Ranjit Kasle
BJP Ram Shinde : 'विखेंनी अजूनही उत्तर दिलेलं नाही, पण मी जे बोललो ते बोललो'; प्रा. राम शिंदे 'त्या' अनुभवावर ठाम! (VIDEO)

विधानसभा निवडणूक 2024 मधील परळी विधानसभा मतदार संघ 233 ची मतदान प्रक्रिया भारत निवडणूक आयोग (Election Commission) यांचे निर्देशानुसार 20 नोव्हेंबर 2024 पूर्ण झाली. सर्व मतदान केंद्रावरील CU, BU, VVPAT ही मतदान यंत्र न्यू क्लब बिल्डींग थर्मल कॉलनी परळी इथं निरीक्षक, राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, निवडणूक अधिकारी, केंद्रीय सुरक्षा दलाचे पोलिस आणि सीसीटीव्ही कॅमेरे यांचे समक्ष मतदान यंत्र मतदान केंद्र निहाय ठेवण्यात आले. यानंतर स्ट्रॉगरुम हे सीलबंद करण्यात आले होते. निवडणूक प्रक्रियेचा निकाल 23 नोव्हेंबर 2024 घोषित करण्यात आल्याने निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेली आहे.

Ranjit Kasle
Vaibhav Naik Vs Nilesh Rane : बिडवलकर हत्या प्रकरण : 'आता मी मैदानात, त्यांना जेलची वारी...'; निलेश राणेंचा वैभव नाईकांना इशारा

बीड जिल्हा पोलिस दलातील बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक रणजित कासले याचा समाज माध्यमावर परळी विधानसभा निवडणूक संदर्भाने व्हिडिओ व्हायरल झाल्याचे निदर्शनास आले. त्यात त्याने पत्रकारांसमोर वक्तव्य केले की, माझ्या बँकेच्या खात्यावर 21 नोव्हेंबर 2024 ला 10 लाख रुपये आले. हे पैसे परळी विधानसभा निवडणूक प्रक्रियेतील EVM मशीन पासून दूर राहणे आणि EVM मशीनमध्ये जी काही छेडछाड होईल, त्यासाठी गप्प बसायचे आणि सहन करायचं, असे वक्तव्य केल्याकडे फिर्यादीत लक्ष वेधले आहे.

निवडणूक प्रक्रियेबाबत शंका

रणजित कसले याने, अशाच प्रकारे निवडणुका जिंकल्या जात आहेत. पूर्ण सरकारच अशाच प्रकारे निवडणुकीत निवडून आले आहे, असे वक्तव्य करून जाणिवपूर्वक लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या राज्य सरकारबाबत महाराष्ट्रातील जनतेच्या मनात निवडणूक प्रक्रियेबाबत शंका निर्माण केली. सामाजिक शांतता बिघडेल, अशा प्रकारचे पत्रकारांसमोर वक्तव्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

निवडणूक आयोगाची बदनामी

याशिवाय निवडणूक आयोगाबाबत तसेच परळी विधानसभा मतदार संघातील निवडणूक प्रक्रियेबाबत खोटे विधान केले. देशाचे सार्वभौमत्व आणि सुरक्षा धोक्यात येईल, अशी खोटी वक्तव्य करून ते समाज माध्यमांवर प्रसारित झाल्याने निवडणूक आयोगाची बदनामी केल्याचे अण्णा वंजारे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सहायक निरीक्षक दीपक राठोड गुन्ह्याचा तपास करणार आहेत.

10 लाख रक्कमेबाबत वेगळीच माहिती

दरम्यान, रणजित कासले याच्या खात्यावरील 10 लाख रक्कमेबाबत वेगळीच माहिती समोर आली आहे. अंबाजोगाईतील ठेकेदार सुदर्शन काळे यांच्याकडून घेतलेल्या उसणे पैशातील दोन लाख रुपये परत केले नसल्याची तक्रार पोलिस अधीक्षकांकडे केली आहे. तसंच निवडणूक आयोगाने रणजित कासलेबाबत स्पष्टीकरण देताना, 2024 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान त्याला कोणत्याही प्रकारची निवडणूक ड्युटी लावण्यात आली नसल्याचे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com