जालना : भाजपचे माजी मंत्री परतूरचे आमदार बबनराव लोणीकर (Mla Babanrao Lonikar) आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेकदा अचडणीत आले आहेत. (Jalna) आता त्यांनी अधिकाऱ्यांवर आपला राग काढत त्यांना गेंड्याच्या कातडीचे म्हटले आहे.(Marathwada) त्यांच्या ढोपरात इंजेक्शन टोचले तर बिघडले कुठे? असे म्हणत संताप व्यक्त केला आहे.
गेल्या काही महिन्यांपुर्वी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीग्रस्त तालुक्याची यादी प्रशानाने तयार केली होती. त्यात लोणीकर यांचा परतूर मतदारसंघ वगळण्यात आला. अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांच्या यादीत परतूरचे नाव नाही हे कळाल्यावर लोणीकरांचा पारा चढला आणि जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्यांनी प्रशानाला धारेवर धरले.
`अधिकाऱ्यांची कातडी जाड असेल तर त्यांच्या ढोपरात इंजेक्शन टोचलं तर बिघडतं कुठं`? असा सवाल लोणीकरांनी अधिकाऱ्यांना केला. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या बैठकीत हा प्रकार घडला. माजी मंत्री आणि भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी तलाठ्यापासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्व महसूल यंत्रणेवर संताप व्यक्त केला.
बबनराव लोणीकर यांच्या मतदार संघातील परतूर तालुका अतिवृष्टी झालेल्या तालुक्यांच्या यादीतून वगळण्यात आला. त्यामुळे लोणीकरांनी थेट पालकमंत्री राजेश टोपे यांच्यासमोरच संबंधित अधिकाऱ्यांना खडसावले.
तलाठी, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी,सुपरवायजर, तहसीलदार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, निवासी जिल्हाधिकारी,जिल्हाधिकारी कृषी अधिकारी एवढे अधिकारी असतील अन् यांची कातडी जाड असेल तर ढोपरात इंजेक्शन टोचलं तर बिघडतं कुठं, असे म्हणत त्यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली.
महाराष्ट्रात सगळीकडे फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पैसे मिळाले, मग नुकसान होऊनही परतूर तालुक्यातील शेतकऱ्यांना भरपाई का मिळाली नाही? त्या शेतकऱ्यांवर तुम्ही अन्याय का करता? असा सवालही लोणीकरांनी उपस्थित केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.