वोट बॅंकेवर डोळा ःऔरंगाबादेत राष्ट्रवादीकडून शहर-जिल्हाध्यक्षपदी मुस्लिम चेहरा

औरंगाबाद राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या शहर-जिल्हाध्यक्षपदी शरीफउद्दीन ख्वाजा यांची निुयक्ती करण्यात आली आहे. (Ncp Aurangabad)
Jayant Patil
Jayant Patil Sarkarnama

औरंगाबाद ः आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी आणि सोशल इंजिनिअरिंग सुरू केले आहे. शिवसेनेने (Shivsena) स्वबळाची तयारी सुरू केल्यामुळे राज्याच्या सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी व काॅंग्रेसच्या (Ncp) भूमिकेकडे देखील सगळ्यांचे लक्ष लागले आहे. (Aurangabad) त्यातच राष्ट्रवादीकडून शहर-जिल्हाध्यक्षपदासाठी मुस्लिम समाजाला संधी मिळावी, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून वरिष्ठ नेत्यांकडे लावून धरण्यात आली होती.

अखेर ही मागणी मंजुर झाली असून औरंगाबाद राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या शहर-जिल्हाध्यक्षपदी शरीफउद्दीन ख्वाजा यांची निुयक्ती करण्यात आली आहे. मुंबई येथील राष्ट्रवादी भवनात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. ख्वाजाभाई हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोनवेळा नगरसेवक राहिलेले आहेत.

शिवाय त्यांच्या मुस्लिम समाजात चांगला जनसंपर्क देखील आहे. महापालिका निवडणुकीवर डोळा ठेवत शिवसेना, भाजप, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी, काॅंग्रेस, राष्ट्रवादी व इतर छोट्या मोठ्या पक्षांनी तयारी सुरू केली आहे. गेली २५-३० वर्ष महापालिकेच्या सत्तेत एकत्र असलेले शिवसेना-भाजप आता एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणार आहेत.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेव आले तेव्हा राज्यातील सर्वच निवडणुका एकत्र लढण्याची घोषणा नेत्यांकडून करण्यात आली होती. मात्र पक्षाचा विस्तार करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, असे म्हणत सगळ्यांनीच स्थानिक पातळीवर परिस्थीती पाहून निर्णय घेण्याचे ठरवले. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने महागाईच्या विरोधात मोर्चा काढत महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा एकाप्रकारे नारळच फोडला.

Jayant Patil
राष्ट्रवादीच्या सोळंके - पंडितांचे पॅचअप : आता वाटचाल कोणत्या दिशेने?

आघाडीची चर्चा आणि स्थानिक नेते त्याला अनुकूल असतांना संजय राऊत यांनी मात्र तुम्ही तयारीला लागा आघाडीची चिंता करू नका, आम्ही ते पाहून घेऊ असे सांगत, स्थानिक नेत्यांना स्वबळाचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आघाडी सरकारमधील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काॅंग्रेसने देखील स्वतंत्र तयारी सुरू केली आहे.

एमआयएमकडे वळालेला मतदार पुन्हा राष्ट्रवादीकडे आणण्याचे मोठे आव्हान नेत्यासमोर आहे. पण शहर-जिल्हाध्यक्षपदी मुस्लिम चेहरा देत राष्ट्रवादीने त्यादृष्टीने एक पाऊल पुढे टाकले असेच म्हणावे लागेल. राष्ट्रवादीने केलेला हा खांदेपालट किती यशस्वी ठरतो हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com