

Talathi Bogus Recruitment:तहसीलदारांच्या बनावट सही, शिक्क्यांचा वापर करत दोघांना बोगस तलाठी नियुक्तीचे आदेश देत ४१ लाख ५० हजार रुपयांना फसवल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलीसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाचे बनावट ई-मेल आयडी, ओळखपत्रे, टॅब आणि तहसीलदार शिवानंद बिडवे यांच्या नावाने बनावट स्वाक्षरी पत्र तयार करूनतलाठी पदाचे नियुक्ती आदेश दिल्याचा प्रकार समोर आला आहे. यासाठी आरोपींनी दोघांकडून 41 लाख 50 हजार रुपये उकळले.
ही धक्कादायक घटना २४ फेब्रुवारी ते १३ ऑगस्ट दरम्यान घडली. बाळासाहेब हरबक आणि त्यांचा एक साथीदार अशी फसवणूक करणाऱ्यांची नावे असून त्यांच्या विरोधात सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी जिल्हा कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी अनिल कारभारी भगत यांनी तक्रार दिली. त्यानुसार आजिनाथ ज्ञानेश्वर वरकड (वय 43) राहणार मावसाळा तालुका खुलताबाद यांनी अर्ज दिला. अजिनाथ यांच्या पत्नी अश्विनी तुपे आणि अक्षय साईनाथ गायकवाड राहणार एन-२, सिडको यांचा भाऊ स्वप्निल गायकवाड यांना तलाठी पदावरील नियुक्तीचे आदेश 10 ऑगस्ट 2026 रोजी ईमेल वरून बाळासाहेब हरवक व साथीदारांनी पाठवले.
13 ऑगस्टला केलेल्या पडताळणीत हे आदेश बनावट असल्याचे उघड झाले. नियुक्तीपूर्वी 24 फेब्रुवारीपासून सुभेदारी विश्रामगृह तहसील कार्यालय व पंचायत समितीत आठवड्यातून तीन दिवस प्रशिक्षणही दिले गेले. त्यांना पुणे व कोल्हापूरहून प्रशिक्षक येत असल्याचे सांगण्यात आले.
आरोपींनी आजिनाथ यांच्या पत्नीच्या नियुक्तीसाठी १३ लाख ५० हजार रूपये तर अक्षय यांच्याकडून भावाच्या नियुक्तीसाठी २८ लाख घेतले. ही सर्व रक्कम ऑनलाईन, फोन पे व रोख स्वरूपात दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सहाय्यक निरीक्षक मनोज शिंदे प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.