Nagesh Ashtikar News : बोगस IAS कल्पना भागवतने ठाकरेंच्या खासदारालाही अडकवले जाळ्यात; पैसे मागितले अन् दिलेही...

Fake IAS scam 2025 : छत्रपती संभाजीनगर शहरातील एका पंचतारांकित हाॅटेलात आयएएस अधिकारी म्हणून कल्पना भागवत यांनी मुक्काम ठोकला होता. सरकारी फायली असलेली ब्रिफकेस, महागड्या गाडीतून एन्ट्री करत कल्पना भागवत हिने हाॅटेल स्टाफवर आपला प्रभाव टाकला होता.
Nagesh Ashtikar news
Nagesh Ashtikar newsSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : एक दोन नव्हे तर तब्बल सहा महिने छत्रपती संभाजीनगरच्या पंचतारांकित हाॅटेल आएएस अधिकारी म्हणून मुक्काम ठोकलेल्या 'ठग'कल्पना भागवत हिच्या पोलीस चौकाशीतून अनेक धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. तिच्या खात्यात ज्या एकरा लोकांनी पैसे जमा केले त्या यादीमध्ये हिंगोलीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचेही नाव असल्याचे समोर आले आहे. एका कार्यकर्त्याच्या माध्यमातून ही महिला आपल्याकडे आली होती, तिने मंदिर बांधकामासाठी म्हणून एकदा आणि दुसऱ्यांदा अपघात झाल्याचे सांगून आपल्याकडून पैसे घेतल्याचे मान्य केले आहे.

पाकिस्तान अफगाणिस्तानमधील नागरिकांचे पासपोर्ट आणि मोबाईल नंबर असलेल्या कल्पना भागवतचे अफगाणी व्यक्तीबरोबर संबंध असल्याचे समोर आले होते. या प्रकरणात कल्पनासह अन्य दोघांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींना न्यायालयीन कोठडी मागण्यासाठी केलेल्या अर्जात पोलिसांनी नागेश आष्टीकर यांचे नाव नमूद केल्याची माहिती आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्याशी सरकारनामा प्रतिनिधीने संपर्क साधला परंतु तो होऊ शकला नाही. दरम्यान, आष्टीकर यांनी पुतण्याच्या माध्यमातून या महिलेने वेगवेगळी कारणे सांगून आपल्याकडून काही रकमा घेतल्याचे स्पष्टीकरण दिले. याशिवाय आपला संबधित प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे आष्टीकर यांनी आधीच स्पष्ट केले आहे.

कोण आहे कल्पना भागवत?

छत्रपती संभाजीनगर शहरातील एका पंचतारांकित हाॅटेलात आयएएस अधिकारी म्हणून कल्पना भागवत यांनी मुक्काम ठोकला होता. सरकारी फायली असलेली ब्रिफकेस, महागड्या गाडीतून एन्ट्री करत कल्पना भागवत हिने हाॅटेल स्टाफवर आपला प्रभाव टाकला होता. मी कल्पना भागवत, IAS. UPSC 2017 – रँक 333, ट्रेनिंगनंतर महाराष्ट्र कॅडर, असे ती सांगायची. पुढे सहा महिने तिने याच हाॅटेलात मुक्काम केला. दरम्यान, तिच्या संशयास्पद हालचाली, दिवसेंदिवस खोलीतून बाहेर न येणे, रुम सर्विसलाही कोणाला आत येऊ न देणे यामुळे हाॅटेल व्यवस्थापनाला शंका आली.

Nagesh Ashtikar news
Santosh Bangar News : फडणवीसांनी झापलेल्या शिंदेंच्या आमदाराला होऊ शकतो कारावास; कायद्यातील शिक्षेची तरतूद पाहिली का...

या संदर्भात त्यांनी पोलीसांना माहिती दिली आणि एका अधिकाऱ्याने हाॅटेलात जाऊन कल्पना भागवत यांच्याकडे आधार कार्ड मागितले. संशय आल्याने तिच्या रुमची तपासणी केली आणि बोगस आयएएस कल्पना भागवत हिचा भांडाफोड झाला. प्रकरण फक्त बोगस आयएएस म्हणून ती हाॅटेलात मुक्काम करत होती एवढ्यावरच थांबले नाही, तर याचे धागेदोरे थेट दिल्ली, गृहमंत्रालय, अफगाणिस्तान, उजेबिकस्तान, पाकिस्तान पर्यंत जाऊन पोहचले.

पाच पानांचे बनावट आयएएस असल्याचे नियुक्तीपत्र, युपीएससी 2017 ची बनावट रँक लिस्ट, ज्यात तिसऱ्या क्रमांकावर तिचे नाव होते. त्यासोबत पुणे विद्यापीठाकडून दिल्यासारखं बनावट बेस्ट IAS ऑफिसर अवॉर्ड चे प्रमाणपत्र, दोन मोबाईल फोन पोलिसांच्या हाती लागले. फोनमधील व्हॉट्सअॅप चॅटसमध्ये अफगाणिस्तानच्या अशरफचा नंबर, शेकडो परदेशी पासपोर्ट्सचे फोटो, उझबेक, ताजिक, अफगाण, बांग्लादेशी व्हिसा स्टिकर्स, एंट्री-एग्झिट स्टॅम्प्स, असं घबाडचं पोलिसांच्या हाती लागलं.

Nagesh Ashtikar news
BJP Election news : दिल्लीच्या निवडणुकीत भाजपला झटका; आपने गड राखले, काँग्रेसलाही मिळाला बूस्टर डोस...

पोलिसांनी कल्पना भागवतचे बँक डिटेल्स तपासले तेव्हा जानेवारी ते नोव्हेंबरदरम्यान 32 लाखांहून अधिक रक्कम तिच्या खात्यात आली होती. काही आॅनलाईन तर काही हवाला मार्गे. त्यात काही पैसे अफगाणी व्यक्तीकडून टाकण्यात आले होते. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन 26 नोव्हेंबरला या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र एटीएसकडे सोपवण्यात आला. 27 नोव्हेंबरला दिल्लीहून आयबीचे दोन अधिकारी छत्रपती संभाजीनगरला दाखल झाले.

28 नोव्हेंबरला दिल्लीहून अभिषेक चौधरी नावाच्या आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आली जो स्वतःला गृह मंत्रालयाचा ओएसडी असल्याचे सांगत होता. 29 नोव्हेंबरला पुण्यातून आणखी दोन जणांना अटक, त्यापैकी एक अफगाण नागरिक आहे. आता कल्पना, अफगाणी अशरफ आणि अन्य एक असे तिघे संभाजीनगर पोलीसांच्या कोठडीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com