Girish Mahajan : शेतकऱ्यांकडून तात्काळ मदतीची मागणी, मंत्री गिरीश महाजन म्हणाले, मी पैसे घेऊन आलो नाही!

Angry Farmers Stop Girish Mahajan vehicle : एकतर संपूर्ण मराठवाडा पाण्यात बुडाल्यासारखी परिस्थिती असताना कृषी मंत्री, त्या त्या जिल्ह्यांचे पालकमंत्री या भागात फिरकत नाहीयेत.
Girish Mahajan Visit Flood Affected Dharashiv News
Girish Mahajan Visit Flood Affected Dharashiv NewsSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांनी तातडीने मदत देण्याची मागणी केली.

  2. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी "मी पैसे घेऊन आलो नाही" असे विधान केले.

  3. संतप्त शेतकऱ्यांनी महाजनांच्या गाड्यांचा ताफा अडवून निषेध नोंदवला.

Marathwada Flood News : अतिवृष्टी, ढगफुटी आणि पुराने मराठवाड्यात थैमान घातले आहे. अनेक गावांना पाण्याचा वेढा पडला आहे. घरं, शेती,पीकं,जनावरे वाहून गेली. अनेक जिल्ह्यात असे विदारक चित्र असताना मंत्री गिरीश महाजन यांनी तात्काळ मदतीची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची थट्टा केली. मी सोबत पैसे घेऊन आलो नाही, अशी भाषा महाजन यांनी वापरली. मंत्र्यांच्या अशा असंवेदनशीलतेमुळे लोकांमध्ये चीड आहे.

दरम्यान, गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या गाड्यांचा ताफा संतप्त शेतकऱ्यांनी भूम तालुक्यातील चिंचपूर ढगे गावात अडवला. एकीकडे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे जीवाची पर्वा न करत पुरात अडकलेल्या लोकांचे प्राण वाचवण्यासाठी छातीभर पाण्यात उतरून मदत करत आहेत. तर दुसरीकडे सत्ते असलेल्या मंत्र्यांकडून मात्र अरेरावीची भाषा वापरली जात आहे. धाराशिव जिल्ह्यात पावसाने हाहाकार उडाला आहे.

एकतर संपूर्ण मराठवाडा (Marathwada) पाण्यात बुडाल्यासारखी परिस्थिती असताना कृषी मंत्री, त्या त्या जिल्ह्यांचे पालकमंत्री या भागात फिरकत नाहीयेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचेही या सगळ्या परिस्थितीकडे कमालीचे दुर्लक्ष झाले आहे. कोणालाही मराठवाड्यात येऊन शेतकरी, सर्वसामान्य लोकांचे होणारे हाल बघावेसे वाटत नाहीये. उशीरा जाग आल्याप्रमाणे आता मंत्र्यांचे पाहणी दौरे सुरू झाले आहेत. अशातच धीर, दिलासा देण्याऐवजी जबाबदार मंत्र्यांकडून अशा प्रकारे थट्टा सुरू आहे.

Girish Mahajan Visit Flood Affected Dharashiv News
Ncp : अतिवृष्टी, पुराने शेतकरी, नागरिक हैराण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मात्र वाटाघाटीत दंग

राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. भूम तालुक्यातील चिंचपूर ढगे गावात पूरामुळे मोठे नुकसान झाले. घरांची पडझड झाली तर शेकडो जनावरे वाहून गेली. सरकारकडून कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत किंवा दिलास न मिळाल्यामुळे इथे लोकांमध्ये सरकारबद्दल आधीच रोष आहे. त्यात गिरीश महाजन उशीरा पाहणीसाठी आल्याने शेतकरी उद्विग्न झाले होते. त्यांनी गिरीश महाजन यांचा ताफा अडवला. आमची जनावर मेली आहेत, तात्काळ मदत द्या, अशी मागणी त्यांनी महाजन यांच्याकडे केली.

Girish Mahajan Visit Flood Affected Dharashiv News
Girish Mahajan Politics : गिरीश महाजनांच्या सल्ल्याची जादू ; दोन कट्टर राजकीय विरोधक एकत्र ; वाजंत्री लावून स्वागत..

यावर मी प्रशासनाला सांगून मदत करायला लावतो. मी पैसे घेऊन आलो नाही, असा त्रागा गिरीश महाजन यांनी केला. यावर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केला, हा गोंधळ पाहून गिरीश महाजन हे पुढच्या गावाची पाहणी करण्यासाठी निघून गेले. मदतीचा निर्णय हा मंत्रीमंडळ बैठकीतला विषय आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे हे मदतीबाबत ठरवतील. नुकसान खूप मोठं आहे याची मला जाणीव आहे.

मी दौऱ्यावरच आहे, काल रात्री बीडला,जळगावला होतो, आज धाराशिवला आलो आहे. दोन-तीन दिवसापासून आपले मुख्यमंत्र्यांशीही बोलणे सुरू असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले. सरकार योग्य निर्णय घेईल, वेगवेगळ्या ठिकाणी परिस्थिती वेगळी आहे. जिथे ओला दुष्काळ होता तिथे ओला दुष्काळ जाहीर केला जाईल. आवश्यक असेल त्या ठिकाणी योग्य तो निर्णय घेतला जाईल. शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहू, अशी ग्वाही महाजन यांनी यावेळी दिली.

FAQs

प्रश्न 1. शेतकऱ्यांनी कोणती मागणी केली?
तात्काळ आर्थिक मदतीची मागणी केली.

प्रश्न 2. गिरीश महाजन यांनी काय विधान केले?
"मी पैसे घेऊन आलो नाही" असे त्यांनी सांगितले.

प्रश्न 3. शेतकऱ्यांनी आंदोलन कसे केले?
महाजनांच्या गाड्यांचा ताफा अडवून आंदोलन केले.

प्रश्न 4. हे प्रकरण कुठल्या संदर्भात घडले?
आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीच्या मागणीवरून.

प्रश्न 5. या घटनेचा काय परिणाम झाला?
सरकारविरोधातील शेतकऱ्यांचा संताप अधिक तीव्र झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com