NCP News : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या औरंगाबाद जिल्हाध्यक्षावर जिवघेणा हल्ला; प्रकृती चिंताजनक

पैठण तालुक्यातील बोकुड जळगाव ग्रामपंचायतीची नुकतीच निवडणूक झाली होती. त्या निवडणुकीत दोन गटात वाद झाला होता.
NCP
NCPSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : ग्रामपंचायत (Gram Panchayat) निवडणुकीच्या (Election) वादातून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (NCP) औरंगाबाद (Aurangabad) जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब तरमळे यांच्यावर जिवघेणा हल्ला (Attack) करण्यात आला आहे. या हल्ल्यात तरमळे गंभीर जखमी झाले आहेत. तरमळे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Fatal attack on Aurangabad District President of Nationalist Youth Congress)

पैठण तालुक्यातील बोकुड जळगाव ग्रामपंचायतीची नुकतीच निवडणूक झाली होती. त्या निवडणुकीत दोन गटात वाद झाला होता. त्या वादातूनच हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळी झालेल्या वादाचा राग मनात धरून विरोधी गटाकडून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तरमळे यांच्यावर हल्ला करण्यात आलेला आहे.

NCP
Deepak Kesarkar : अजितदादांचा आम्हाला अभिमान ; शिंदे गटाच्या मंत्र्याकडून कौतुक

या जिवघेण्या हल्ल्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तरमळे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. एकंदरीतच ग्रामपंचायत निवडणुकीतील वाद भाऊसाहेब तरमळे यांच्या जिवावर बेतला आहे.

NCP
Jyoti Mete-Fadnavis : ज्योती मेटे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार का? फडणवीसांनी दिले हे उत्तर....

बोकुड जळगाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून झालेल्या हल्ल्या प्रकणी सात जणांविरोधात बिडकीन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान, या हल्ल्यामुळे पैठण तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com