परळी वैजनाथ : आठ दिवसांपुर्वी परळीतील (Parli Kidnap Case) एका व्यापाऱ्याचे पाच जणांनी शहरातील व्यापारी अमोल डुबे यांचे खंडणीसाठी अपहरण केले होते. त्यांच्याजवळील रोख रक्कम, सोन्याच्या वस्तू आणि इतर साहित्य हिसकावून नंतर त्यांची सुटका करण्यात आली होती. या प्रकरणाने बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. अखेर या अपहरण प्रकरणातील पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
व्यापारी (Beed News) अमोल विकासराव डुबे यांचे 9 डिसेंबरला रात्री नऊ वाजेच्या सुमारास औद्योगिक वसाहतीतील कार्यालयाजवळून अपहरण करण्यात आले होते. रोख रक्कम व त्यांच्याजवळील सोन्याची बिस्किटे हिसकावून घेतल्यानंतर अपहरणकर्त्यांनी त्यांची सुटका केली होती. दरम्यान, याप्रकरणात अमोल डुबे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीसांना आठ दिवसांत या प्रकरणाचा छडा लावण्यात यश आले असून पाच आरोपींसह अपहरणात वापरलेली दोन वाहने व रोख रक्कम, असा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. अमोल विकास डुबे यांचे अनोळखी पाच व्यक्तींनी तोंडाला रुमाल बांधुन येवून मोटारसायकल अडवत अपहरण केले होते. डुबे यांना बंदूकीचा धाक दाखवत जबरदस्तीने गाडीत बसवून अपहरण करण्यात आले होते.
तसेच जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या. कन्हेरवाडी घाटामध्ये खंडणी म्हणून त्यांच्याकडे असलेले नगदी 3 लाख 88 हजार 300 रुपये व 10 तोळे सोन्याची बिस्कीटे असा अंदाजे एकूण 8 लाख 27 हजार 300 रुपयांचा माल लुटला होता. डुबे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी पाच आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांच्या आदेशानुसार तपासी अंमलदार धनंजय ढोणे यांनी तपास केला.
यासह आरोपी शोधकामी प्रशासनाकडून वेगवेगळे तपास पथके तयार करुन सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले होते. विविध ठिकाणाहून माहिती घेत गुन्हा उघडकीस आणण्यात अखेर पोलिसांना यश आले. आयटी सेलच्या मदतीने घटनास्थळाचा मोबाईल टॉवर डाटा घेऊन सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींचा पोलीसांनी माग काढला.
गुन्ह्यातील आरोपी चैतन्य पंढरी उमाप (वय 24, रा. पळसखेडा, ता.केज), सागर ऊर्फ बबलु शंभु सुर्यवंशी (वय 22, रा. आंबेडकर चौक, लातूर, ह.मु. अंबाजोगाई), शंकर भगवान जोगदंड (वय 22, रा. साठे नगर, परळीवेस ता. अंबाजोगाई), सचिन श्रीराम जोगदंड (वय 25, रा. साठे नगर, ता. अंबाजोगाई), जय ऊर्फ सोनु संजय कसबे (वय 26, रा. सिध्दार्थ नगर, परळी) या आरोपींना अटक करण्यात आली आहे. खंडणीपोटी घेतलेले 10 तोळे सोन्याचे बिस्कीटं, 8 लाख रुपये व नगदी 1 लाख 12 हजाराची रक्कम आरोपींकडून जप्त करण्यात आली आहे. गुन्ह्यात फिर्यादीचे अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेल्या दोन कारही जप्त करण्यात आल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.