
जत : ‘‘भाजपच्या उमेदवाराची जतच्या मातीशी नाळ जोडलेली नाही. त्यांची पार्श्वभूमी आटपाडीच्या मतदारांना माहिती आहे. अनेक गोरगरीब जनतेच्या जमिनी लाटल्या, अनेकांना दहशतीखाली ठेवण्यासह अनेक गोष्टी त्यांनी केल्या आहेत. जत तालुक्याचे वातावरण दूषित होईल. याचा पश्चाताप जनतेला करावा लागेल. जतला सुरक्षित ठेवायचं असेल तर काँग्रेससोबत राहा,’’ असे आवाहन माजी राज्यमंत्री आमदार विश्वजित कदम यांनी केले.
‘‘जत तालुक्याचा पाणीप्रश्न गंभीर होता, आमदार सावंत यांनी येथील जनतेच्या खांद्याला खांद्याला लावून पाण्याची चळवळ उभारली. पूर्व भागातील काही गावे तुबची-बबलेश्वर योजनेच्या पाण्यामुळे समाधान व्यक्त करत आहेत. विक्रम सावंत हे आपला माणूस म्हणून हे शक्य झालं. यासाठी त्यांना सर्वाधिक मताधिक्य द्या,’’ असेही आमदार कदम यांनी सांगितले.
आमदार सावंत यांच्या प्रचारार्थ शेगाव, बनाळी येथे सभा झाली. यावेळी ‘डीपीआय’चे संस्थापक-अध्यक्ष सुकुमार कांबळे, जिल्हा बँक संचालक प्रकाश जमदाडे, रमेश पाटील, बाबा शिंदे, करीम मेस्त्री, मोहन कुलकर्णी, महादेव अंकलगी, दत्ता निकम, परशुराम सांगोलकर, गुंडा माने महादेव साळुंखे, अण्णासाहेब गायकवाड, रवी पाटील, सचिन गायकवाड, युवराज निकम, अण्णासाहेब कोडग, अविनाश वाघमारे, विवेक कोकरे, योगेश व्हनमाने आदी उपस्थित होते.
प्रकाश जमदाडे म्हणाले, ‘‘फडणवीस यांनी जातीवादाचं विष पेरलं आहे. ते मोडीत काढायचं आहे, अन्यथा स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीतही आटपाडीचा उपरा उमेदवार जतच्या निवडणुकीत दिसेल. जतचा स्वाभिमान हा विकाऊ नाही. तो स्वाभिमानी आहे. येणाऱ्या निवडणुकीत बाहेरच्या उमेदवाराला धडा शिकवेल.’’
शिवसेना प्रवक्ते रणजित बागल म्हणाले, ‘‘इथली माणसं दुष्काळाने पिचलेली असतील. मात्र, त्यांनी स्वाभिमान सोडलेला नाही. बाहेरून येणारी प्रवृत्ती येथील जनता ठेचून काढेल. लबाड बोलण्याची फॅक्ट्री म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे. अनेकांना विकासाची स्वप्नं दाखवून त्यांनी स्वार्थ साधला आहे. याला दुष्काळी जनता बळी पडणार नाही.’’
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.