Georai APMC News : पंडितांनी साधले सोशल इंजिनिअरिंग ; गेवराईच्या सभापतीपदी पहिल्यांदाच मुस्लिम व्यक्ती...

Amarsingh Pandit : बिनविरोध निवडीची घोषणा झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून जल्लोष केला.
Georai APMC News, Beed District
Georai APMC News, Beed DistrictSarkarnama

Beed : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Georai APMC News) निवडणुकीत माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी विकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी झाले. सोमवारी (ता.१५) बाजार समितीच्या सभापतिपदी मुजीब पठाण तर उपसभापतिपदी विकास सानप यांची बिनविरोध निवड झाली.

Georai APMC News, Beed District
Ambadas Danve Letter to jyotiraditya scindia : बंद विमानसेवा पुन्हा सुरू करा, दानवेंचे पत्र..

बाजार समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच मुस्लिम समाजाचा व्यक्ती सभापतिपदी विराजमान झाला आहे. (Beed News) नवनिर्वाचित सभापती आणि उपसभापती यांचे अमरसिंह पंडित, विजयसिंह पंडित आदींनी अभिनंदन केले. (Marathwada) गुलालाची उधळण करून कार्यकर्त्यांनी जल्लोषात या निवडीचे स्वागत केले.

गेवराई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी आमदार अमरसिंह पंडित यांना भाजप आमदार लक्ष्मण पवार आणि माजी आमदार बदामराव पंडित यांनी आव्हान देण्याचा प्रयत्न केला. (Ncp) मात्र अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली १८ पैकी १८ संचालक ९० टक्क्यांहून अधिकची मते घेऊन विजय झाले. या निवडणुकीत आजी-माजी आमदारांच्या पॅनलचा राष्ट्रवादीकडून धुव्वा उडाला.

आज निवडणूक निर्णय अधिकारी कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभापती व उपसभापतिपदाच्या निवडणुकीत मुजीब पठाण यांचा सभापतिपदासाठी तर विकास सानप यांचा उपसभापतिपदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे दोघांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांनी निवडणूक प्रक्रिया सुरु होण्यापूर्वी सभापती आणि उपसभापती पदाच्या उमेदवारांची घोषणा केली.

बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या उपस्थितीत दोघांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. बिनविरोध निवडीची घोषणा झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून जल्लोष केला. मराठवाड्यातील अग्रगण्य बाजार समिती म्हणून गेवराई बाजार समितीची ओळख असून आजवर स्वच्छ आणि पारदर्शक कारभारामुळे विरोधकांना सुद्धा बाजार समितीवर आरोप करता आले नाहीत. सर्वांनी मिळून एकत्रित कारभार करून बाजार समितीच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांची सेवा करायची असल्याचे अमरसिंह पंडित यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com