World Telecomunication Day News : तेव्हा महाजनांच्या विधानाची खिल्ली, पण आज प्रत्येक शेतकऱ्याच्या हाती मोबाईल..

Maharashtra : २००० च्या सुरुवातीस भारत संचार निगम लमिटेडच्या माध्यमातून पहिल्यांदाच इन्कमिंग फ्री करत मोबाईल सर्वसामान्यांच्या हातात.
World Telecomunication Day News
World Telecomunication Day NewsSarkarnama
Published on
Updated on

Jalna : सत्ताधारी आणि विरोधक कायम ऐकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतात. सध्याचे केंद्रातील मोदी सरकार काॅंग्रसेला उद्देशून ७० वर्षात काय केले? असा प्रश्न विचारत असते, त्याला या पक्षाच्या नेत्यांकडून हरित क्रांती, शैक्षणिक, उद्योग क्षेत्रात केलेल्या कामांचा दाखल देत प्रत्युत्तर दिले जाते. (World Telecomunication Day News) प्रत्येक सरकार आपल्या कार्यकाळात आपापल्या परीने विकास करण्याचा प्रयत्न करत असेत.

World Telecomunication Day News
Ashok Chavan On Mahavikas Aghadi Meeting : महाविकास आघाडीच्या बैठकीत जागा वाटपाची चर्चाच झाली नाही...

देशातील दुरसंचार क्षेत्रात ९० च्या दशकात देशाने मोठी झेप घेतली. तार संदेशाच्या युगात मोबाईलची क्रांती झाली. तेव्हा केंद्रात दिवंगत अटलबिहारी वाजपेयी (Let.atal bihari vajpayee) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार होते. प्रमोद महाजन (Pramod Mahajan) हे या सरकारमध्ये दूरसंचार मंत्री होते. एकदा संसदेत भाषण करतांना त्यांनी एक दिवस आपल्याला प्रत्येक शेतकऱ्यांच्या हातात मोबाईल पहायचा आहे, असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.

तेव्हा अशक्य वाटणाऱ्या या विधानाची विरोधकांनी खिल्ली देखील उडवली होती. परंतु आज प्रमोद महाजन यांनी तेव्हा केलेले ते विधान खरे ठरले आहे. (Bjp) आज देशातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या हातात मोबाइल आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शेतकरी आपली शेतीविषयक कामे तर करतोच, पण देश आणि जगाशी देखील जोडला गेला आहे. आज जागतिक दूरसंचार दिन असल्यामुळे प्रमोद महाजन यांच्या त्या विधानाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.

दुरध्वीन येण्यापुर्वी तारेने संदेश दिले जात होते. मात्र २१ व्या शतकाच्या सुरुवातीपासून संदेश व संवाद माध्यमांमध्ये आमूलाग्र बदल होत गेले. या श्रेणीत मोबाइल, इंटरनेट आले आणि अल्पावधीतच याचे जाळे संपुर्ण देशात पसरले. भारतात मोबाईल युगाची सुरुवात ९० च्या दशकात झाली. मात्र अगदी "खास "लोकांच्या हातात असणारा हा मोबाईल सामान्यांच्या हातात आला तो तत्कालीन दिवंगत केंद्रीय दूरसंचार व प्रसारण मंत्री प्रमोद महाजन यांच्या प्रयत्नामुळे.

तत्कालीन माहिती व दूरसंचार मंत्री प्रमोद महाजन यांनी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारमध्ये दूरसंचार क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी बजावली. आधुनिक तंत्रज्ञानाकडे देश वाटचाल करीत होता, त्यावेळी मोबाईल हा फक्त मेट्रोसिटी पुरता मर्यादित होता. अगदी गॅस कनेक्शन व मोबाईल हे सुद्धा खासदार कोट्यातून मिळायचे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आणि इन्कमिंगसाठी देखील २५ ते ३० रुपये माजावे लागायचे.

World Telecomunication Day News
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray : दंगल प्रकरणी नितेश राणे यांनी मातोश्रीवर केलेल्या आरोपांची एसआयटी चौकशी करा..

२००० च्या सुरुवातीस भारत संचार निगम लमिटेडच्या माध्यमातून पहिल्यांदाच इन्कमिंग फ्री करत मोबाईल सर्वसामान्य व्यक्तीच्या हातात आणला तो प्रमोद महाजन यांनीच. प्रमोद महाजन यांनी संसदेत आपल्या भाषणात म्हटले होते की, " ये जो मोबाईल है वो मै खेत मे काम करनेवाले किसान के हात मे देखना चाहता हु. और एक दिन ये मोबाईल देश के हर किसान के हाथ मे होगा! ये मेरा सपना है!! त्यांच्या या भाषणावरून त्यांची खिल्ली देखील उडवण्यात आली होती. मात्र दोन दशकानंतर आज हाच मोबाईल प्रत्येक शेतकऱ्याच्या प्रत्येक व्यक्तीच्या हातात आहे तो देखील इंटरनेट सुविधांनी परिपूर्ण. दूरसंचार दिनाच्या निमित्ताने महाजनांनी मोबाईल क्षेत्रात केलेल्या या कार्याचा उल्लेख झाल्याशिवाय राहत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com