Avinash Pathak Custody : कोट्यवधीचा घोटाळा, बीडच्या तत्कालीन कलेक्टर पाठकांच्या विरोधात न्यायालयाकडून अ‍ॅक्शन, थेट पोलिस कोठडीत रवानगी!

Avinash Pathak Beed Collector Police Custody : तांत्रिक तपासात बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक गुन्ह्यात सहभाग आढळला आहे. त्यावरून त्यांना गुरुवारी ताब्यात घेण्यात आले होते. शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.
Beed Land Acquisition Scam; IAS Avinash Pathak
Beed Land Acquisition Scam; IAS Avinash Pathaksarkarnama
Published on
Updated on

Beed News : बनावट आदेशाने 68 कोटी रुपयांचा भूसंपादन मावेजा 310 कोटी रुपयांवर नेऊन 241 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात पावणे पाच महिन्यांनंतर पोलिसांच्या विशेष तपास समितीने अटक केलेल्या बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठकला न्यायालयाने १५ मे पर्यंत आठ दिवस पोलिस कोठडी सुनावली.

उपजिल्हाधिकारी भूसंपादन सतीश धुमाळ यांनी यासंदर्भातील फिर्याद नोव्हेंबर २०२५ मध्ये शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून सहायक महसूल अधिकारी संजय हंगे, कंत्राटी डेटा एंट्री ऑपरेटर अविनाश चव्हाण, कंत्राटी ऑपरेटर शेख अजहर शेख बाबू, निवृत्त कंत्राटी कर्मचारी त्रिंबक पिंगळे, सहायक महसूल अधिकारी पांडुरंग पाटील यासह ॲड. नन्नवरे, ॲड. नरवडकर, ॲड. पिसुरे, ॲड. राख या 10 जणांवर गुन्हा नोंद झाला.

यातील संजय हंगे, त्रिंबक पिंगळे व शेख अजहर या तिघांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलेले आहे.

तांत्रिक तपासात तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठकचा सहभाग आढळला आहे. त्यावरून त्यांना गुरुवारी ताब्यात घेण्यात आले, तर शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.आर. शिंदे यांच्यासमोर हजर केले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर शिंदे यांनी 15 मे पर्यंत पाठकला पोलिस कोठडी सुनावली.

Beed Land Acquisition Scam; IAS Avinash Pathak
Fake Godman Arrest : ‘महाराज’चा खेळ खल्लास! अंनिसचा पाठपुरावा, भोंदूगिरीत राजेंद्र गडगेसह पाच जण गजाआड

दरम्यान, जिल्हाधिकारी म्हणून बदलीनंतर काही लवाद आदेश काढल्याचे नोंदीतून समोर आले आहे. सदर आदेश स्वत:च्या लॅपटॉप व संगणकावर टाइप केलेले असल्याने त्यांची जप्ती तसेच घोटाळ्यातील 154 पैकी 148 संचिका सापडल्या असून उर्वरित संचिकांचाही शोध, लॅपटॉप व संगणक जप्ती व हा घोटाळा मोबाइलमधील रेकॉर्डिंगमुळे समोर आल्याने पाठकच्या आवाजाचे नमुने घेण्यासाठी एसआयटीने अविनाश पाठकच्या पोलिस कोठडीची मागणी केली.

पाठक यांच्या बदलीनंतर या घेाटाळ्यातील आरोपी हंगे व पाठक यांचे लोकेशन एकत्र आढळल्याचे यावेळी न्यायालयासमोर व्यंकट राम यांनी न्यायालयाला सांगितले. स्वाक्षऱ्यांच्या फॉरेन्सिक तपासण्यांचा अहवालही सादर करण्यात आला. त्यामुळे त्याच्या लातूर, मुंबई येथील ठिकाणांच्‍या पंचनाम्यासाठी देखील पाठकला कोठडी मागण्यात आली.

सरकार पक्षाकडून ॲड. योगेश सरवदे व तपास अधिकारी तथा भारतीय पोलिस सेवेतील परिविक्षाधिन अधिकारी व्यंकट राम यांनी न्यायालयात बाजू मांडली. अविनाश पाठककडून ॲड. कालिदास थिगळे, ॲड. अनिल कांकरिया, ॲड. मिलिंद वाघीरकर, ॲड. सुमीत कांकरिया यांनी बाजू मांडली. एसआयटीचे प्रमुख अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर उपस्थित होते.

Beed Land Acquisition Scam; IAS Avinash Pathak
Pune Police crime : पुण्यात रक्षकच बनले भक्षक! 55 वर्षीय प्राचार्यांना 'पोक्सो'ची भीती दाखवून पोलिसांनीच उकळली खंडणी!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com