Ramnath Kovind News : माजी राष्ट्रपतींनीही कान टोचले, म्हणाले स्वातंत्र्यापासूनचा सांप्रदायिक तणाव आजही कायम

Maharashtra : औरंगाबादचे नाव आता छत्रपती संभाजीनगर झाले आहे. नावाचा उल्लेख होण्यासाठी आणखी वेळ लागेल.
Ex. President Ramnath Kovind News
Ex. President Ramnath Kovind NewsSarkarnama

Marathwada : `स्वातंत्र्यावेळी आणि संविधान निर्माण करतेवेळी पूर्ण देशात सांप्रदायिक वैमनस्याचे वातावरण होते. कधीकधी मी विचार करतो कि, देशाची सगळ्यात मोठी कमजोरी (Ex. President Ramnath Kovind News) हीच आहे की, जेव्हापासून देशाची निर्मिती झाली, तेव्हापासून हा सांप्रदायिक तणाव ना संपलेला आहे, ना आजही वाटते तो संपणार आहे.`, असे परखड मत माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केले. मणिपूर, पश्चिम बंगालमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर कोविंद यांनी हे मत व्यक्त केल्याची चर्चा होत आहे.

Ex. President Ramnath Kovind News
Pune News : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याची तयारी जोरात; महानगरपालिकेने अधिकाऱ्यांना दिले महत्त्वाचे आदेश

मराठवाड्यातील पद्म पुरस्कारार्थींना कोविंद (Ramnath Kovind) यांच्याहस्ते गौरविण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात हा कार्यक्रम झाला. अध्यस्थानी कुलगुरु डॉ. प्रमोद येवले होते. (Marathwada) महाराष्ट्राची भूमी प्रेरणा देणारी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, सावित्रीबाई फुले यांची पावनभूमी आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्म, कर्म, रणभूमी आहे.

बाबासाहेब म्हणायचे, शिका संघटित व्हा, संघर्ष करा. यातही ते शिक्षण क्षेत्राकडे अधिक झुकलेले होते. (Aurangabad) दीनदुबळे, वंचितासाठी ते समाजकार्यात ओढले गेले. स्वातंत्र्यकाळात सौहार्दपूर्ण वातावरणासाठी राजकीय नेते म्हणायचे कि, आधी भारतीय नंतर हिंदू, मुसलमान पण, बाबासाहेब म्हणायचे, आधी भारतीय, नंतर आणि शेवटीही भारतीयच. जाती, धर्म, संप्रदायचा प्रभाव त्यांच्यावर नव्हता.

औरंगाबादचे नाव आता छत्रपती संभाजीनगर झाले आहे. नावाचा उल्लेख होण्यासाठी आणखी वेळ लागेल. अजूनही अनेक ठिकाणी जुनाच उल्लेख आढळतो. ही बाब श्री कोविंद यांनी निदर्शनास आणली. देशाचे १४ वे राष्ट्रपती पदावरुन बाजूला झाल्यानंतर कोविंद यांनी देशातील सध्याच्या परिस्थितीवर केलेल्या परखड वक्तव्याची चर्चा होत आहे. मराठवाडा ही सामाजिक क्रांतीची आणि परिवर्तनाची भूमी आहे.

याच भुमीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने शिक्षणाबरोबरच सामाजिक सलोखा आणि सहिष्णुता अबाधित राखण्यासाठी मार्गदर्शक काम करावे, असे आवाहन रामनाथ कोविंद यांनी केले. तर परिवर्तनाचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विद्यापीठ गेटचे सुशोभिकरण पूर्ण झाले, याचा मनस्वी आनंद झाला असल्याचे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले म्हणाले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com