Sattar-Gadkari-Saha

Sattar-Gadkari-Saha

Sarkarnama

गडकरी, शहांनी शब्द दिला, तर शिवसेना-भाजप युती शक्य..

राज्यात शिवसेना-भाजपमध्ये टोकाचा संघर्ष असतांना शिवसेनेचे एक मंत्री थेट दिल्लीत जाऊन युतीची शक्यता व्यक्त करत असल्यामुळे राजकीय वर्तुळात याबद्दल चर्चेला उधाण आले आहे. (Abdul Sattar)

नवी दिल्ली ः पुढील अडीच वर्षही मुख्यमंत्री पद शिवसेनेकडे देण्याचा शब्द केंद्रीय गृहमत्री अमित शहा (Amit Saha) आणि नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिला, तर शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येऊ शकतात, असे विधान शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केले आहे. (Shivsena) दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतल्यानंतर एका वृत्तवाहिनीशी बोलतांना सत्तार यांनी हे विधान केले.

नितीन गडकरी यांच्याकडेच शिवसेना-भाजपला एकत्र आणण्याची चावी असल्याचेही सत्तार म्हणाले. अब्दुल सत्तार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आपल्या मतदारसंघासह औरंगाबाद जिल्ह्यातील विविध राष्ट्रीय, राज्य मार्गांच्या कामासंदर्भात भेट घेतली. या भेटीनंतर एका वृत्तावाहिनीशी बोलतांना सत्तार यांनी युती संदर्भात विधान केले.

सत्तार म्हणाले, नितीन गडकरी यांचे आणि शिवसेनेचे संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे आहेत. शिवाय गेली अनेक वर्ष हे दोन पक्ष एकत्र होते. नितीन गडकरी किंवा अमित शहा यांनी जर शिवसेनेला पुढील अडीच वर्ष मुख्यमंत्री पद देण्याचे मान्य केले तर हे दोन पक्ष पुन्हा एकत्र येऊ शकतात. शिवसेनेकडू कुठलीही अडचण राहणार नाही.

नितीन गडकरी यांच्याकडे या दोन पक्षांना एकत्र आणण्याची चावी आहे. त्यांनी पुढाकार घेतला तर हे सहज शक्य आहे. सत्तार यांनी हे विधान केल्यामुळे याचे राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये काय पडसाद उमटतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

शिवसेनेचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून राज्यातील भाजपचे नेते, केंद्रीय तपास यंत्रणा या सर्वांवर सडकून टीका करतात. मोदी यांनी नुकतीच बारा कोटींची मर्सिडीज खरेदी केली, यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यांच्यावर खरमरीत टीका केली.

<div class="paragraphs"><p>Sattar-Gadkari-Saha</p></div>
रश्मी ठाकरे किंवा आदित्य मुख्यमंत्री झाल्यास कुणाची हरकत नसेल..

राज्यात शिवसेना-भाजपमध्ये टोकाचा संघर्ष असतांना शिवसेनेचे एक मंत्री थेट दिल्लीत जाऊन युतीची शक्यता व्यक्त करत असल्यामुळे राजकीय वर्तुळात याबद्दल चर्चेला उधाण आले आहे. सत्तार यांच्या या विधानाला केंद्रातील विशेषतः गडकरी, शहा हे नेते किती महत्व देतात आणि इकडे राज्यात मुख्यमंत्री व आघाडीचे नेते याकडे कसे बघतात? याकडेही सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com