गेवराई : विजयसिंह पंडितांमध्ये जिद्द व क्षमता असून त्यांना विकासाचे व्हिजन आहे. त्यांना अमरसिंह पंडित यांची साथ आहे. त्यांना गोदावरी नदीप्रमाणे सिंदफना नदीवर बॅरेजेस बांधायचे आहेत. उजव्या कालव्याची वहन क्षमता वाढवायची आहे.
अशा नेतृत्वाच्या पाठीशी तुमची ताकद द्या. मी सर्व महाराष्ट्राची ताकद विजयसिंह पंडित यांच्या पाठीशी लावतो. पंडित यांना विजयी करा, गेवराईच्या विकासासाठी चार हजार कोटी रुपयांचा निधी देणार, हा अजित पवारांचा वादा आहे असे, आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांच्या प्रचारार्थ सभेमध्ये ते बोलत होते. अजित पवार म्हणाले, विरोधक संविधान बदलणार असल्याच्या अफवा पसरवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत.
जातीय सलोखा बिघडवला जात आहे. कोणीही संविधान बदलू शकत नाही. माझी लाडकी बहीण योजननेतून महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जात असून मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण तसेच ५२ लाख कुटुंबांना वर्षातून तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. मागेल त्याला सौरपंप, शेती पंपाची वीजबिल माफी, शेतकऱ्यांना एक रुपयात विमा, शेतकरी सन्मान योजना, युवा प्रशिक्षण योजने अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना सहा हजार ते दहा हजार रुपये दिले जाणार आहेत.
विजयसिंह पंडित म्हणाले की, गोदावरी नदीप्रमाणे सिंदफना नदीव सात बॅरेजेस बांधून ३२ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणले जाईल. यासाठी अजीत पवार यांनी मदत करावी. विरोधक मात्र केलेल्या कामावर न बोलता आमच्यावर टिका करत आहेत. एकाने बौद्ध स्मशानभूमी पाहूण्याच्या नावावर केली तर एक सावजीचा आव आणून अपक्ष उभारले.
त्यांनी खाजगी मार्केट कमिटीचे काय झाले, याचेही उत्तर द्या, त्याचे उत्तर द्यावे असेही ते म्हणाले. माजी मंत्री शिवाजीराव पंडित, पक्षाचे सरचिटणीस अमरसिंह पंडित, उमेदवार विजयसिंह पंडित, जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे, बहुजन विकास मोर्चाचे बाबूराव पोटभरे, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे कल्याण आखाडे, किशोर कांडेकर, उद्धव खाडे, भाऊसाहेब नाटकर, प्रकाश सुरवसे यांची उपस्थिती होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.