Ghansawangi APMC Result News : राष्ट्रवादीच्या टोपेंचा विरोधकांना दे धक्का, सर्व जागा जिंकत मारली बाजी..

NCP : टोपे यांनी चोथे समर्थकास एक जागा देऊन कर्मयोगी अंकुशराव टोपे शेतकरी विकास पॅनल उतरविले होते.
Ghansawangi APMC Result News
Ghansawangi APMC Result NewsSarkarnama

Jalna : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत (Ghansawangi APMC Result News) राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटाच्या शिवाजी चोथे यांच्या पॅनलने अठरा पैकी अठरा जागा मिळवून निर्विवाद वर्चस्व मिळवले. तर प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्ष व शिवसेना ठाकरे गटाच्या डॉ.हिकमत उढाण यांच्या पॅनलला एकही जागा मिळवता आली नाही. घनसावंगी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या पंधरा वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे.

Ghansawangi APMC Result News
Osmanabad District APMC Election : राणा पाटलांनी तुळजापूर, धाराशीवमध्ये सत्ता राखली ; जिल्ह्यात महाविकास आघाडीची सरशी..

यंदाच्या निवडणुकीत आमदार राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सतरा व शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार शिवाजी चोथे यांच्या समर्थकास एक जागा देऊन कर्मयोगी अंकुशराव टोपे शेतकरी विकास पॅनल उतरविले होते. (Ncp) तर शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख डॉ. हिकमत उढाण व भाजपचे सतीश घाटगे पाटील यांनी युती करून सरळ लढत दिली.

मागील पंधरा दिवसापासून राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. (Jalna) यात दोन्ही पॅनलकडून प्रचारसभा, बैठका, वैयक्तिक भेटीगाठी यासह वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते. यात राष्ट्रवादी व ठाकरे गटाचे चोथे यांच्या पॅनलने सर्वच्या सर्व जागा जिंकत विरोधकांना धूळ चारली.

हे आहेत विजयी उमेदवार

सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून सर्वसाधारण प्रवर्गातून गणेश राधाकिसन आर्दड, महादेव तुकाराम काळे, महेश राजेश्‍वरराव कोल्हे, तात्यासाहेब एकनाथराव चिमणे, बद्रीनारायण त्रिंबक जाधव, बापूसाहेब वसंतराव देशमुख, दीपक भिमाशंकर शिवतारे. महिला राखीव प्रवर्गातून कुशीवर्ता रामदास घोगरे, मिराबाई दत्तात्रय वराडे, सेवा सहकारी संस्था इतर मागासवर्गीय राखीव प्रवर्गातून सुभाष सुंदरराव गाडेकर.

तर सेवा सहकारी संस्था विमुक्त जाती भटक्‍या जाती राखीव प्रवर्गातून ज्ञानराज रामेश्‍वर भालेकर, ग्रामपंचायत सर्वसाधारण प्रवर्गातून जगन्नाथ बाबासाहेब काकडे, वसंत दामोधर भुतेकर, ग्रामपंचायत अनुसूचीत जाती जमाती प्रवर्गातून अण्णासाहेब बापूराव साबळे, ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातून नकुल सिताराम भालेकर, व्यापारी मतदारसंघातून दत्तात्रय शेषराव कंटूले, बाळासाहेब बापूसाहेब जाधव, हमाल मापाडी मतदारसंघातून अजिम खान इमामखान यांचा समावेश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com