Dr.Bhagwat Karad : पाणी देण्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारची, आम्ही गॅस देवू ..

पेट्रोलिय कंपनीच्या वतीने नगर आणि औरंगाबाद या दोन जिल्ह्यांमध्ये पाच वर्षात तब्बल ४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. (Dr.Bhagwat Karad)
Dr.Bhagwat Karad-Uddhav Thackeray
Dr.Bhagwat Karad-Uddhav ThackeraySarkarnama

औरंगाबाद : मराठवाडा विशेषत: औरंगाबाद जिल्ह्यासाठी पीएनजी गॅसलाईन ही महत्वाची योजना आहे. या योजनेचे भूमीपूजन उद्या, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदिपसिंह पुरी यांच्या हस्ते व्हिडिओ काॅन्फरन्सिंग द्वारे होणार आहे. (Aurangabad) वातावरणातील प्रदूषण कमी करून, माफक दरात सीएनजी आणि घराघरात घरगुती गॅस पोहचवण्याची ही योजना आहे. (Bjp) येत्या डिसेंबरपर्यंत शहरातील पहिल्या ग्राहकाला आम्ही गॅस देणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ.भागवत कराड (Dr.Bhagwat Karad) व गॅस कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी दिली.

शहरातील नागरिकांना पाण्याची आवश्यकता असतांना आधी गॅस का? या प्रश्नावर पाणी देण्याची जबाबदारी ही महाराष्ट्र सरकारची आहे, केंद्राकडून आम्ही नागरिकांना घराघरात गॅस देणार आहोत, असे सांगत कराड यांनी या विषयावर अधिक बोलणे टाळले. औरंगाबाद आणि नगर या दोन जिल्ह्यात साडेतीनशे किलोमीटरच्या गॅस पाईपलाईनद्वारे घरगुती आणि सीएनजी गॅस पुरवण्याच्या योजनेचे भूमीपूनज उद्या (ता. २ मार्च) रोजी होणार आहे.

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हे स्वत: या कार्यक्रमासाठी येणार होते. परंतु पतप्रधान मोदी यांनी त्यांच्यावर युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्याची जबाबदारी देत नजीकच्या देशात पाठवले आहे. परंतु जिल्ह्याच्या विकासासाठी महत्वाच्या असलेल्या या प्रकल्पाला विलंब नको म्हणून पेट्रोलियम मंत्री पुरी यांनी आपण व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे भूमीपजून करण्यास मान्यता दिली. त्यामुळे हा कार्यक्रम नियोजित वेळेनूसार होणार असल्याचे कराड यांनी सांगितले.

पेट्रोलिय कंपनीच्या वतीने नगर आणि औरंगाबाद या दोन जिल्ह्यांमध्ये पाच वर्षात तब्बल ४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. साडेतीनशे किलोमीटरच्या पाईपलाईनमधून औरंगाबाद शहर, जिल्हा आणि औद्योगिक वसाहतीला लागणारा गॅस पोहचवण्यासाठी २७ हजार किलोमीटरची पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. येत्या डिसेंबरमध्ये शहरातील पहिल्या ग्राहकाला घरगुती गॅस दिला जाणार आहे.

Dr.Bhagwat Karad-Uddhav Thackeray
मुख्यमंत्र्यांची बदनामी पडली महागात; भाजप तालुकाध्यक्षांवर गुन्हा दाखल...

या शिवाय शंभर सीएनसी स्टेशन देखील सुरू करण्यात येणार आहे. औद्योगिक वापरासाठीचा गॅस देखील या द्वारे पुरवण्यात येणार असून यातून प्रदूषण कमी करणे, जीवतहानीचा धोका टाळणे आणि कमी किमतीत गॅस पुरवण्याचा आपला उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. घरगुती गॅस आताच्या तुनलेत सत्तर टक्के किमंतील मिळू शकेल, असेही कंपनीच्या अधिकारऱ्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमास सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आल्याचे कराड यांनी आवर्जुन सांगितले. पाणी आणि गॅस हे दोन स्वतंत्र विषय आहेत, त्यावर मी वाद घालू इच्छित नाही. पाणी देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे, गॅस आम्ही केंद्राकडून पुरवत आहोत. पाण्याच्या प्रश्नावर आपण स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊ, असेही कराड यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com