Manoj Jarange Patil : सरकारचा डाव यशस्वी होऊ देणार नाही, लढायचे का पाडायचे ? निर्णयाची बैठक पुढे ढकलली...

Manoj Jarang fight or drop? It will be decided later : पुढील तारीख नंतर जाहीर करणार आहोत. आत्ताच आमची भूमिका जाहीर करूण सत्ताधारी पक्षाला आम्ही संधी देणार नाही. त्यांचे डावपेच यशस्वी होऊ देणार नाही. अंतरवाली सराटी येथे इच्छुकांची संख्या वाढली आहे. यामुळे सरकारचे धाबे दणाणले आहे, त्यांना काय निर्णय घ्यावा ? हे कळेना.
Manoj Jarange patil
Manoj Jarange patilSarkarnama
Published on
Updated on

दिलीप दखणे

Maratha Reservation News : आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवार द्यायचे की पाडायचे ? याचा फैसला करण्यासाठी अंतरवाली सराटी येत्या 29 आॅगस्ट रोजी होणारी निर्णायक बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. सरकारने विधानसभेच्या निवडणुका चार महिने पुढे ढकलल्या आहेत. राज्यात कोणती आपत्ती नाही किंवा मोठे असे कारण नाही, तरीही विधानसभा निवडणूक चार महिने पुढे ढकलली आहे. हे सरकार निवडणुकीला घाबरत आहे, असा आरोप करत 29 रोजी होणारी बैठक कधी होणार? याची तारीख नंतर कळवली जाईल, असे जरांगे यांनी माध्यमांना सांगितले.

अंतरवाली सराटी येथील लाठीचार्ज, बदलापूर येथील अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार, त्याच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्यांवर लाठी हल्ला, राज्यात मराठा ,धनगर समाजाचे आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन यावरून राज्यातील मोठे समाज सत्ताधारी सरकारच्या विरोधात आहेत. (Manoj Jarange Patil) या घटना सरकारला पुन्हा सत्तेवर येऊ देणार नाही, याची भिती आणि जाणीव सत्ताधारी पक्षाला झाली आहे. त्यामुळे सरकारने भिती पोटी निवडणूकी फटका बसणार हे ओळखून निवडणूक पुढे ढकलली आहे.

निवडणुका पुढे ढकलल्यामुळे आम्ही 29 रोजी होणारी बैठकही पुढे ढकलली असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. विधानसभा निवडणूक लढ्याची का समोरचे उमेदवार पाडायाचे? या बाबत 29 रोजी होणाऱ्या महत्वाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार होता. परंतु सरकार आमच्या निर्णयाची वाट पाहत होते, आमची रणनिती त्यांना कळु नये, त्यांचे डाव यशस्वी होऊ म्हणून आम्ही पण निवडणूक लांबली असल्याने आमचा निर्णय जाहीर करणार नाही.

Manoj Jarange patil
Maratha Reservation Hearing News : मराठा आरक्षणाची पुढील सुनावणी 26 ऑगस्टला मुंबई हायकोर्टात होणार!

पुढील तारीख नंतर जाहीर करणार आहोत. आत्ताच आमची भूमिका जाहीर करूण सत्ताधारी पक्षाला आम्ही संधी देणार नाही. त्यांचे डावपेच यशस्वी होऊ देणार नाही. अंतरवाली सराटी येथे इच्छुकांची संख्या वाढली आहे. (Maratha Reservation) यामुळे सरकारचे धाबे दणाणले आहे, त्यांना काय निर्णय घ्यावा ? हे कळेना. बदलापूर येथील घटनेचा जाहीर निषेध करतो, कायदा व सुव्यवस्था उपमुख्यमंत्री देवद्र फडणवीस हे बिघडवीत आहेत. यांना राज्य शांत राहावे, असे वाटत नाही, अशी टीका जरांगे पाटील यांनी फडणवीस यांच्यावर केली.

सरकार आरक्षण देत नाही, मराठा समाज एक झाला आहे. येणाऱ्या निवडणूकी मध्ये यांना ताकद दिसणार आहे. अंतरवाली सराटी येथील 29 रोजी ची बैठक सध्या होणार नाही. ती पुढे होईल इच्छुकांनी आपले प्रस्ताव 24 ऑगस्ट पर्यंत दाखल करावे. या प्रस्तावांची छाननी करून राज्यात प्रत्येक तालुक्यात एक बैठक घेऊन निवडणूक बाबत चर्चा करण्यात येणार असल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले.

Manoj Jarange patil
Manoj Jarange Patil : फडणवीस यांनी ठरवले तर ते आरक्षण देऊ शकतात, पण त्यांना ते द्यायचे नाही..

सरकारने राज्यात चार महिने विधानसभेची निवडणूक पुढे लांबवली आहे. सत्ताधारी राज्यात राष्टपती राजवट लागु करतील, तेच परत कारभार बघतील हा सरकारचा डाव आहे. सत्ताधारी पक्षांच्या विरोधात राज्यात वातावरण आहे. येणाऱ्या निवडणुकी मध्ये जनता यांना नक्की धडा शिकवणार आहे. मराठा आरक्षणासाठी आम्हाला मैदानात यावे लागत आहे, असेही जरांगे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com