Gram Panchayat Election Results : आमदार बोरनारेंनी पत राखली, तीनपैकी दोन सरपंच निवडून आणले...

Shivsena News : आमदार बोरनारे यांचे मतदारसंघातील वर्चस्व पुन्हा एकदा दिसून आले आहे.
Gram Panchayat Election Results
Gram Panchayat Election ResultsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Political News : शिंदे गटाचे वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा. रमेश बोरनारे यांनी तीनपैकी दोन ग्रामपंचायतींच्या सरपंचपदावर विजय मिळवला, तर ठाकरे गटाने एका ठिकाणी आपला सरपंच निवडून आणला. (Gram Panchayat Election Results) अगरसायगाव, भिंगी या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी झालेल्या थेट निवडणुकीत अनुक्रमे शिंदे गटाचे जाधव गणेश भास्कर, भागूबाई शिवनाथ शेवाळे या विजयी झाल्या आहेत.

Gram Panchayat Election Results
Gram Panchayat Election Results : शिरसाटांच्या मतदारसंघात विरोधकांचा गुलाल, सरपंचपदासह ग्रामपंचायत ताब्यात...

तर पानगव्हाणच्या सरपंचपदी ठाकरे गटाच्या घायवट मंदाबाई संतोष निवडून आल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या प्रमाणात आमदार प्रा. रमेश बोरनारे (Ramesh Bornare) यांना निधी देऊन बळ दिले आहे. त्याचा चांगला परिणाम दिसून आला आहे, तीनपैकी दोन ग्रामपंचायतींवर बोरनारे यांना सरपंच बसवता आला, तर (Shivsena) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला एका सरपंचपदावर समाधान मानावे लागले.

विशेष म्हणजे भिंगी ग्रामपंचायतीत सगळे सदस्य असताना सरपंचपदाच्या निवडणुकीत मात्र ठाकरे गटाच्या उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागला. (Marathwada) आमदार रमेश बोरनारे यांनी नुकताच मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा दर्शवत आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे त्यांची राज्यभरात चर्चा झाली होती.

मतदारसंघातील तीनपैकी दोन ग्रामपंचायतींचा कारभार ताब्यात आल्यामुळे बोरनारे यांचे मतदारसंघातील वर्चस्व पुन्हा एकदा दिसून आले आहे. या आधीच्या टप्प्यात झालेल्या मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडणुकीतही बोरनारे यांच्या पॅनेलची सरशी झाली होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेल्या बोरनारे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील उठावात सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

त्यांच्या या निर्णयाने मतदारसंघात संतापाचे वातावरण होते, अनेक ठिकाणी त्यांना विरोधही झाला होता, परंतु वर्षभरानंतर झालेल्या थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत बोरनारे यांनी बाजी मारत आपले वर्चस्व दाखवून दिले. एकूणच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण आणि वैजापूर मतदारसंघातील सरपंचपदाच्या निवडीत शिंदे गटाने बाजी मारल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी आपल्या मतदारसंघातील एकमेव वडवाळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदावर स्वाती काळे यांना निवडून आणले आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com