Imtiaz jalil : पालकमंत्री साहेब, औरंगाबाद आमचा बालेकिल्ला म्हणता ना, मग शहरासाठी काय केलं ?

दावोसमध्ये झालेल्या ८० हजार कोटींच्या सामंजस्य कराराचा दाखला देत इम्तियाज जलील यांनी ट्विटच्या माध्यमातून शिवसेना व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना शहरासाठी काय आणले? असा सवाल केला आहे. (Aimim)
Mp Imtiaz Jalil l- subhas Desai
Mp Imtiaz Jalil l- subhas Desai Sarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : दावोस (स्वित्झर्लंड) येथे नुकत्याच झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राने विदेशातील कंपन्यांशी तब्बल ८० हजार कोटींचे सामंजस्य करार केले. (Auragabad) याबद्दल राज्य सरकार व उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांचे कौतुक होत आहे. तर आधी झालेल्या कोट्यावधींच्या करारा पैकी प्रत्यक्षात किती गुंतवणूक झाली? अशी टीका देखील सरकारवर होत आहे.

विशेष म्हणजे यावेळी झालेल्या ८० हजार कोटींच्या करारापैकी एकाही रुपयाची गुंतवणूक ही मराठवाड्याची राजधानी आणि औद्योगिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबादेत आलेली नाही. यावरुन आता उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्यावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी निशाणा साधला आहे.

दावोसमध्ये झालेल्या ८० हजार कोटींच्या सामंजस्य कराराचा दाखला देत इम्तियाज जलील यांनी ट्विटच्या माध्यमातून शिवसेना व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना शहरासाठी काय आणले? असा सवाल केला आहे. महाराष्ट्र सरकारशी झालेल्या करारानूसार मुंबई, पुणे, नाशिक, विदर्भ, रायगड आदी जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार आहे.

परंतु डीएमआयसी सारखा महत्वाकांक्षी प्रकल्प, शेंद्रा पंचतारांकित एमआयडीसी आणि तिथे उद्योगांसाठी उपलब्ध असलेली तब्बल १० हजार एकर जागा असतांना या करारातून औरंगाबादच्या वाट्याला एकही उद्योग न आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

Mp Imtiaz Jalil l- subhas Desai
गाड्यांच्या टाक्या फुल करा नाहीतर 31 तारखेला होईल परवड! हे आहे कारण...

खासदार इम्तियाज जलील यांनी सुभाष देसाई व शिवसेनेवर टीकास्त्र सोडतांना म्हटले आहे की, सुभाष देसाई साहेब तुम्ही राज्याचे उद्योगमंत्री आणि योगायोगाने जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहात. औरंगाबद हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, अस आपण व आपला पक्ष नेहमी म्हणतो.

मग आपण व आपल्या पक्षाने या शहरासाठी काय आणले ? असा प्रश्न या निमित्ताने इम्तियाज जलील यांनी उपस्थितीत केला आहे. ८० हजार कोटींच्या करारांमध्ये शहराच्या वाट्याला काहीच गुंतवणूक आली नाही, हे उद्योगमंत्र्यांचे अपयश नाही का? अशी चर्चा देखील यानिमित्ताने राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com