Harshvardhan Jadhav In Antarwali : जरांगे मागताहेत ते आरक्षण टिकणारे नाही, हर्षवर्धन यांचा अंतरवालीत येत दावा...

Jalna Maratha Protest News : केंद्राने कायदा केला, तर त्याला न्यायालयदेखील नाकारू शकणार नाही.
Harshvardhan Jadhav News
Harshvardhan Jadhav NewsSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation News : अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र आणि त्याआधारे आरक्षण या मागणीसाठी पंधरा दिवसांपासून उपोषणाला बसलेले आहेत. (Jalna Maratha Protest) आज त्यांनी आंदोलन सुरू ठेवत सरकारच्या मागणीप्रमाणे एक महिन्याची मुदत दिली.

Harshvardhan Jadhav News
Maratha Reservation Special : लढा मराठा समाजाचा @ जालना : दिवस पंधरावा, गावात पाठिंब्यासाठी रांगा आणि... भाग-६

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी आमदारकीचा राजीनामा देणारे माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांनी काल अंतरवाली सराटीत जाऊन जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. पण या वेळी त्यांनी मराठा आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची मागणी करत आपली भूमिकाही मांडली.

जाधव यांनी गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून सोशल मीडियावर आपली भूमिका मांडली. मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र दिले तरी त्यांना मिळणारे आरक्षण कोर्टात टिकणार नाही. (Marathwada) त्यापेक्षा आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी केंद्रात कायदा करावा, तेव्हाच हा प्रश्न सुटेल, अशी भूमिका घेत जाधव यांनी कन्नड तालुक्यात साखळी उपोषणही केले.

मोदी सरकार जर एका दिवसात नोटबंदी करू शकते, लाॅकडाऊनचा निर्णय घेऊ शकते, तर मग आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा निर्णय का घेऊ शकत नाहीत? असा सवालही त्यांनी उपस्थितीत केला. अंतरवाली सराटीतही त्यांनी मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळावे, या मागणीऐवजी आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका मांडली. केंद्राने कायदा केला, तर त्याला न्यायालयदेखील नाकारू शकणार नाही, असा दावा जाधव यांनी केला.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com