Harshvardhan Jadhav On Loksabha : मुसलमान निवडून येतो म्हणून माझ्या नावाने कितीही खडे फोडा, मी लोकसभा लढवणारच...

Marathwada Political News : अशाच घाणेरड्या राजकारणाने शहराचे आणि जिल्ह्याचे वाटोळे झाले आहे.
Ex. Mla Harshvardhan Jadhav News
Ex. Mla Harshvardhan Jadhav NewsSarkarnama

Aurangabad Political News : माझ्यामुळे मुसलमान खासदार निवडून आला म्हणून माझ्या नावाने खडे फोडणाऱ्या गधड्यांनो, आधी एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंचा लोकसभेला एकच उमेदवार उभा करून दाखवा, असे आव्हान माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दिले आहे. (Loksabha News ) माझ्या नावाने कितीही बोंबललात तरी मी दोनशे टक्के लोकसभा लढवणारच, अशी घोषणाही जाधव यांनी केली.

Ex. Mla Harshvardhan Jadhav News
Ambadas Danve On Sattar : सत्तार तुम्हाला कधीही फसवतील, दानवेंनी जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षाला केले सावध...

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadahv) यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यांनी तब्बल २ लाख ८३ हजार मते घेतल्यामुळे शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांचा पाच हजार मतांनी पराभव झाला होता, तर एमआयएमचे इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) हे विजयी झाले होते. तेव्हापासून जाधव यांच्यावर त्यांच्यामुळे छत्रपती संभाजीनगरात मुस्लिम खासदार निवडून आला, हिरवा फडकला असा आरोप केला जातो.

याचाच संदर्भ देत जाधव यांनी पुन्हा एकदा आरोप करणाऱ्यांना सुनावले. तसेच आपण येणारी लोकसभा निवडणूक लढवणारच, असेही ठणकावून सांगितले. (Marathwada) या संदर्भात जाधव यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे. स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या चंद्रकांत खैरे यांनी २५ वर्षांत काय दिवे लावले. डाॅ. भागवत कराड केंद्रात मंत्री आहेत, त्यांनी काय दिवे लावले, शहरासाठी काय आणले ?

मराठा आरक्षणासाठी भांडणारा, हनुमान मंदिराच्या सभागृहासाठी घरातून १२ लाख देणारा, जनतेचा कर वाचावा म्हणून सरकारशी लढणारा, सतत जय शिवराय म्हणणारा मी मुसलमान? आणि जो भाजपचा राष्ट्रीय प्रवक्ता छत्रपती शिवाजी महाराजांनी चार वेळा औरंगजेबाची माफी मागितली असे विधान करतो तो हिंदुत्ववादी? तुमच्या डोक्यात फरक पडला आहे का? अशाच घाणेरड्या राजकारणाने शहराचे आणि जिल्ह्याचे वाटोळे झाले आहे.

त्यामुळे कुणाला काय कूटनीती करायची, राजकारण करायचे ते करू द्या, मी दोनशे टक्के लोकसभा लढवणारच, असा निर्धार हर्षवर्धन जाधव यांनी बोलून दाखवला. खासदार इम्तियाज जलील यांच्यासोबत आता वंचित आघाडी नाही, हे लक्षात घ्या. मुस्लिमांनीही इम्तियाज यांचे जास्त लांगुलचालन करू नये, लेबरकाॅलनीत तुमची घरं पाडली तेव्हा ते तुमच्या मदतीला धावून आले नव्हते, अशी टीकाही जाधव यांनी केली.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com