हर्बल तंबाखू की गांजा? हे मलिकांनाच विचारा; मी खात नाही आणि ओढतही नाही

(Bjp State President Chandrakant Patil) फडणवीस सरकार असतांना सत्तेत असणारे हेच लोक बेंबीच्या देठापासून ओरडत होते. नुकसान झालेल्यांना हेक्टरी पंचवीस हजाराची मदत द्या, आणि आता तेच दहा हजार रुपयांची मदत जाहीर करीत आहेत
Chandrakant Patil-Nawab Malik
Chandrakant Patil-Nawab MalikSarkarnama
Published on
Updated on

औसा ः शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकऱणाला अवास्तव महत्व देत ठाकरे सरकारने अजित पवारांच्या नातेवाईकांवरील आणि अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरचे लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न केला आहे. दोन्ही प्रश्न लोकांच्या जिव्हाळ्याचे आणि महत्वाचे असतांना त्यावरुन आपली कोंडी होऊ नये यासाठी या सरकारने ही दोन्ही प्रकरणे उचलून धरली, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. ते औसा येथे पत्रकारांशी बोलत होते.

कोण हा शाहरुख आणि त्याचा मुलगा, महाराष्ट्रातील कोट्यावधी लोकांपैकी एक माणुस. पण त्याला आणि त्याच्या मुलाला वाचविण्यासाठी या सरकारने आणि त्यांच्या मंत्र्यांनी आकाश पाताळ एक केले. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांच्या मुळ प्रश्नाला बगल दिली गेली. केंद्रीय तपास यंत्रणांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नातेवाईकांच्या घरावर, कार्यालयावर टाकलेल्या धाडीत काय सापडले? मराठवाड्यातील शेतकरी अतिवृष्टीने उध्वस्त झाला त्याला आधार मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे.

आघाडी सरकारचा हा नाकर्तेपणा लोकांच्या लक्षात येऊ नये म्हणुन आर्यन खान प्रकरण पुढे केले गेले. मराठवाड्यात ३८ लाख हेक्टरवरल पिके वाहून गेली, करा लाख हेक्टर क्षेत्रावरची माती वाहून गेली. अजुन शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. फडणवीस सरकार असतांना सत्तेत असणारे हेच लोक बेंबीच्या देठापासून ओरडत होते. नुकसान झालेल्यांना हेक्टरी पंचवीस हजाराची मदत द्या, आणि आता तेच दहा हजार रुपयांची मदत जाहीर करीत आहेत, असा टोला देखील पाटील यांनी आघाडी सरकारला लगावला.

२०१९ मध्ये आम्ही जाहीर केलेले पॅकेज शेतकरी आता मागत आहेत, ते ठाकरे सरकारने द्यावे. महीलांवर वाढते अत्याचार या सरकारचे अपयश आहे. वाझे प्रकरणात हे सरकार वाझेंची पाठराखण करत होते मात्र देवेंद्र फडणवीस यांनी वाझेंचा आणि या सरकारचाही खरा चेहरा जगासमोर आणला.

तंबाखु की गांजा? मला माहीत नाही.

गांजा की हर्बल तंबाखू याची चव मला माहीत नाही, कारण मी ती खात नाही व ओढतही नाही. जे हे सांगतात त्यांनाच त्याची चव माहीत असणार असा टोला पाटील यांनी राष्ट्रवादीचे नवाब मलीक यांना लगावला.

Chandrakant Patil-Nawab Malik
बीड जिल्ह्यात चाललंय काय? सहा महिन्यात दुसरा बनावट देशी दारुचा कारखाना उघडकीस

उसाची एफआरपी हे सरकार तीन टप्यात देणार असे बोलत आहे, ते एक रकमी देणे कायद्याने बंधनकारक आहे हे या सरकारला कळत नाही का? कोर्टाने यांना अनेक प्रकरणात ठोकले असतांनाही अशी असंवैधानीक विधाने हे करीत आहेत आणि शरद पवार देखील त्यांच्या मताला सहमती दाखवतात याचे आश्चर्य वाटते, असेही पाटील म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com