Pankaja Munde News: गुन्हा रद्द करण्यासाठी पंकजा मुंडे यांची खंडपीठात धाव..

High Court News: कोरोनाच्या अटी व शर्तींचे उल्लंघन करुन ५ पेक्षा जादा लोक एकत्र करुन दसरा मेळाव्याचे आयोजन केले.
Pankaja Munde
Pankaja MundeSarkarnama
Published on
Updated on

Marathwada News: प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केल्याबाबत दाखल केलेला गुन्हा आणि दोषारोपपत्र रद्द करावे, अशी विनंती करणारा फौजदारी अर्ज भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि जि. प. सदस्या सविता गोल्हार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केला आहे. या अर्जाच्या अनुषंगाने न्या. आर. जी. अवचट आणि न्या. एस. ए. देशमुख यांनी राज्य शासनासह प्रतिवादींना नोटिस बजावण्याचा आदेश दिला आहे.

Pankaja Munde
TB Free Mission News : मोदींच्या टी.बी.मुक्त अभियानाकडे भाजपसह, शिंदे, गटाच्या मंत्री, खासदार, आमदारांची पाठ..

या प्रकरणी ६ आठवड्यानंतर सुनावणी होणार आहे. दरम्यान पाटोदा येथील न्यायालयात दाखल खटल्याच्या सुनावणीस हजर राहण्यापासून वरील दोघींना (Aurangabad High Court) खंडपीठाने सूट दिली आहे. (Bjp) संत भगवानबाबा यांचे जन्मस्थळ असलेले सावरगाव घाट (भगवान भक्तीगड) येथे कोरोना काळात ५० लोकांसह पारंपारीक दसरा मेळावा ऑनलाईन घेण्यासाठी आयोजकांनी २५ ऑक्टोबर २०२० रोजी परवानगी मागीतली होती.

त्यावेळी बीड जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू असल्यामुळे पाटोद्याच्या तहसीलदारांनी केवळ ५ लोकांच्या उपस्थितीतच मेळाव्याची परवानगी दिली होती. (Pankaja Munde) असे असताना भाजप नेत्या पंकजा मुंडे, विद्यमान मंत्री व खासदार भागवत कराड, माजी मंत्री महादेव जानकर, आमदार मोनिका राजळे, आमदार मेघना बोर्डीकर, माजी आमदार श्रीराम धोंडे जि. प. सदस्या सविता गोल्हार, मेळाव्याचे आयोजक संदेश सानप, सावरगाव घाटचे सरपंच रामचंद्र सानप यांच्यासह ४० ते ५० जणांनी प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केला.

तसेच कोरोनाच्या अटी व शर्तींचे उल्लंघन करुन ५ पेक्षा जादा लोक एकत्र करुन दसरा मेळाव्याचे आयोजन केले. यामुळे लोकांच्या जीवितास धोका निर्माण करणारी व हयगय करणारी कृती केली, अशी तक्रार पोलिस ठाण्यात देण्यात आली. त्यावरुन पाटोदा तालुक्यातील अंमळनेर पोलिस ठाण्यात वरील व्यक्तींविरुद्ध भादंवि तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला. तसेच पाटोदा न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल झाले आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड विशाल चाटे यांनी काम पाहिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com