Hingoli NCP News : बंडात साथ नाही, तरी अजितदादांचा दिलदारपणा; आमदार नवघरेंना कोट्यवधींचा निधी...

NCP- SHIVSENA News : भरघोस निधी मिळेल, अशी शिंदे गटातील शिवसेना आमदारांची अपेक्षा होती. मात्र अपेक्षाभंग होताना दिसत आहे.
Hingoli NCP News
Hingoli NCP NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Political News : अजित पवार निधी देत नाहीत, अशी ओरड करत महाविकास आघाडी सरकारमधून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे चाळीस आमदार बाहेर पडले. (Hingoli NCP News) राजकीय घडामोडीत शिंदे मुख्यमंत्री झाले, पण वर्षभरात अजित पवारांनी आपल्या समर्थक आमदारांसह सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिंदे सेनेच्या आमदारांमध्ये चलबिचल होती.

Hingoli NCP News
Supriya Sule: दादांच्या उपस्थितीत बैठक घ्या, सुप्रियाताईंचे मुख्यमंत्र्यांना साकडे...

अजित पवार (Ajit Pawar) करेक्ट कार्यक्रम करण्यात माहीर असले तरी विकासकामांच्या बाबतीत ते कधी तडजोड करत नाहीत, अशी त्यांची ख्याती आहे. याचा अनुभव सध्या शरद पवार गटासोबत असलेले वसमतचे आमदार राजू नवघरे यांना येत आहे. (NCP) अजित पवारांच्या बंडाला साथ दिली नाही, तरी अजितदादांनी दिलदारपणा दाखवत नवघरे यांच्या वसमत मतदारसंघासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर केला आहे.

हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील वसमत विधानसभा मतदारसंघासाठी २३ नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध विकासकामांसंदर्भात मुंबई येथे बैठक घेतली. या वेळी वसमतनगर शहरातील २८ रस्त्यांच्या काँक्रिटीकरण आणि नाला बांधकामासाठी १०८ कोटींच्या निधीला मान्यता दिली. अजित पवार यांच्याशी असलेले सख्य लक्षात घेता नवघरे अजित पवार गटात प्रवेश करतील, अशा चर्चा राजकीय वर्तुळात होत्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मात्र, नवघरे यांनी शरद पवार यांना साथ देण्याचे ठरवले. तरीही अजित पवार यांनी निधीवाटपात कसलाही दुजाभाव न करता नवघरे यांना भरघोस निधी दिला. एकीकडे पक्ष फुटल्यानंतरही अजित पवार आपल्या जुन्या सहकारी आमदारांबद्दल मवाळ भूमिका घेताना दिसत आहेत, तर सत्तेच्या फ्रंट सीटवर असलेल्या शिंदे सेनेचे जिल्ह्यातील एकमेव आमदार संतोष बांगर यांना मात्र झगडावे लागत आहे.

मतदारसंघाचा विकास करण्यासाठी भरघोस निधी मिळेल, अशी शिंदे गटातील शिवसेना आमदार, कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. मात्र, अनेक ठिकाणी अपेक्षाभंग होताना दिसत आहे. याउलट शरद पवार गटाच्या आमदारांना मात्र भरघोस निधी मिळत असल्याचे चित्र आहे. कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनी शिवसेनेतील बंडाळीप्रसंगी प्रारंभी उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला.

मात्र, अचानक भूमिकेत बदल करत एकनाथ शिंदे यांच्याशी हातमिळवणी केली. त्यामुळे मतदारसंघात त्यांच्याविरोधात नाराजी होती, आता मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनामुळेही त्यांना समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. २४ नोव्हेंबर रोजी आखाडा बाळापुर येथील एका कार्यक्रमाहून परत येत असताना मराठा आरक्षण आंदोलकांनी त्यांना काळे झेंडे दाखवले होते. त्यामुळे सत्तेत नसूनही राष्ट्रवादीच्या (शरद पवार) आमदारांना भरघोस निधी, तर पक्षाचे मुख्यमंत्री असलेल्या शिवसेनेच्या आमदार बांगर यांना मात्र नाराजी आणि रोषाला तोंड द्यावे लागत आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com