Hingoli News : राणा पाटलांकडून लोकसभा प्रभारी पद काढून घेतले; सुमठाणकरांकडे जबाबदारी

Marathwada : नुकत्याच झालेल्या मराठवाडा शिक्षक मतदार संघाची जबाबदारी देखील त्यांच्यावर सोपवण्यात आली होती.
Mla Ranajagjeetsingh Patil News, Hingoli
Mla Ranajagjeetsingh Patil News, HingoliSarkarnama
Published on
Updated on

BJP News : राज्यातील सत्तांतर भाजपने लोकसभा प्रवास योजना सुरू केली या अंतर्गत मराठवाड्यातील यापूर्वी शिवसेनेकडे असलेल्या लोकसभा मतदारसंघातून देखील निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. (Hingoli) हिंगोली, उस्मानाबाद,परभणी,औरंगाबाद या चारही लोकसभा मतदारसंघात भाजपने प्रभारीने नेमत तयारी सुरू केली आहे.

Mla Ranajagjeetsingh Patil News, Hingoli
Bjp Vs Shinde Group : शिंदे गटातील नेत्याच्या बालेकिल्ल्यातच भाजप उपसणार आंदोलनाचं अस्त्र; 'हे' आहे कारण

हिंगोलीसाठी तुळजापूरचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील (Ranajagjeetsingh Patil) यांची प्रभारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. (Bjp) नुकत्याच झालेल्या मराठवाडा शिक्षक मतदार संघाची जबाबदारी देखील त्यांच्यावर सोपवण्यात आली होती.मात्र भाजपला या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला.

या निवडणुकीत राणा पाटलांनी उस्मानाबाद जिल्ह्यात शिंदे गटाच्या मंत्री, आमदारांना विश्वासात न घेतल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. राज्याचे आरोग्य मंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी या प्रकारची नाराजी व्यक्त केली होती.

त्यानंतर महिनाभराच्या आतच राणा पाटील यांच्याकडे असलेले हिंगोली लोकसभा प्रभारी पद काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या ऐवजी आता रामदास पाटील सुमठाणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संघटनात्मक बांधणी मंत्र्यांच्या दौऱ्यांचे नियोजन लाभार्थी योजना सोशल मीडिया पक्षाच्या कार्यक्रमाचे नियोजन तसेच बुध सक्षम करण्यासाठी पक्षाने ही जबाबदारी सुमठाणकर यांच्यावर सोपवल्याचे सांगितले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com