Hingoli News : भाजप नवा जिल्हाध्यक्ष देणार ? की मग वडकुते यानांच मुदतवाढ..

Bjp : पदाधिकाऱ्यानी पसंती प्रमाणे दोन इच्छुकांची नावे प्रदेश सचिव देविदास राठोड यांनी सुचवली आहेत.
Hingoli Bjp News
Hingoli Bjp NewsSarkarnama

Marathwada : हिंगोली येथील भाजपा जिल्हाध्यक्ष रामराव वडकुते (Ramrao Wadkute) यांचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्यामुळे नवनिर्वाचीत जिल्हाध्यक्ष पदाच्या दावेदारीकरिता अनेकांची नावे पुढे येत आहेत. त्यातच भाजपाचे प्रदेश सचिव देविदास राठोड यांच्या उपस्थितीत नुकतीच कोअर कमिटीच्या पदाधिकाऱ्यांशी साधलेल्या संवादा दरम्यान काही इच्छुकांच्या नावाला अनेकांनी पसंती दर्शवली. त्यामुळे नवा जिल्हाध्यक्ष कोण? की, मग रामराव वडकुते यांच्या जिल्हाध्यक्ष पदाला पुन्हा मुदतवाढ मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Hingoli Bjp News
Latur News : निलंगेकर-पवारांच्या कुरघोडीच्या राजकारणाचा ग्रामस्थांच्या डोक्याला ताप..

राज्यामध्ये सार्वत्रिक निवडणुकीपुर्वी (Bjp) भाजपच्या नवीन कार्यकारिणीमध्ये अनेक मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. त्यानंतर आता जिल्हास्तरावर पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्याकरिता वारे वाहत असताना भाजपाचे प्रदेश सचिव देविदास राठोड हे पदाधिकान्यांशी संवाद साधण्यासाठी हिंगोलीत येवून गेले. (Hingoli) भाजप जिल्हाध्यक्ष पदाकरिता फुलाजी शिंदे, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, शिवदास बोडेवार, मिलिंद यबल यांची नावे यापूर्वीच पुढे आली होती.

त्यामध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पु चव्हाण यांच्याही नावाची भर पडली. भाजपा प्रदेश सचिव देविदास राठोड यांनी एकट्यामध्ये भाजपा कोअर कमिटी पदाधिकाऱ्यांना बोलावून जिल्हाध्यक्ष पदाकरिता दोन इच्छुकांच्या नावाची पसंती घेतली. (Marathwada) या कोअर कमिटीमध्ये भाजपाचे सरचिटणीस, विविध सेलचे अध्यक्ष, शहराध्यक्ष, प्रदेश कार्यकारिणी सदस्य आदी जवळपास ७५ पदाधिकाऱ्याचा समावेश आहे.

या पदाधिकाऱ्यानी पसंती प्रमाणे दोन इच्छुकांची नावे प्रदेश सचिव देविदास राठोड यांनी सुचवली आहेत. राठोड यांनी गोपनिय पद्धतीने इच्छुकांची मते जाणुन घेतली. या पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधल्यानंतर आता त्याबाबतचा अहवाल पक्षश्रेष्ठीकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतरच जिल्हाध्यक्ष पदाबाबतीत निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, अध्यक्ष पदासाठी इच्छुकांची वाढती दावेदारी पाहता सार्वत्रिक निवडणुकांच्या तोंडावर पक्षांतर्गत कलहाची स्थिती येऊ नये म्हणुन निवडणुकीपर्यंत अध्यक्ष पदाची जबाबदारी रामराव वडकुते यांच्याकडेच ठेवण्याच्या विचारात पक्षश्रेष्टी असल्याचे कळते.

रामराव वडकुते यांनी आपल्या कार्यकाळात अध्यक्ष पदाची धुरा चोखपणे सांभाळली आहे. त्यांच्या कार्यकाळात ओबीसी समाज व धनगर हटकर बऱ्यापैकी पक्षाशी जोडला गेला. वर्षानंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी हा बदल होत असल्याने रामराव वडकुते यांना बदलावे किंवा त्यांना कायम ठेवावे यासाठी देखील खलबते झाली असल्याची चर्चा आहे. प्रदेश सचिवांच्या बैठकीत आमदार तान्हाजीराव मुटकुळे, भाजपा जिल्हाध्यक्ष रामराव वडकुते, लोकसभा प्रभारी रामदास पाटील सुमठाणकर, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार गजाननराव घुगे, भाजपा महिला जिल्हाध्यक्षा उज्वला तांभाळे आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com