Hingoli : मनसेच्या शंभर पदाधिकारी-कार्यकर्त्यांना पोलिसांची नोटिस

शहरातील धडवाई हनुमान मंदिरात मनसेचे जिल्हाप्रमुख बंडू कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी महाआरती व हनुमान चालीसाचा पठण करण्यात आले. (Hingoli)
MNS Maha Arti In Hingoli
MNS Maha Arti In HingoliSarkarnama
Published on
Updated on

हिंगोली : जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शंभर पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिस प्रशासनाने नोटिसा दिल्या आहेत. (MNS) कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणल्यास कारवाई करण्याचा इशारा यामध्ये देण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष (Raj Thackeray) राज ठाकरे यांनी बुधवारी महाआरती तसेच हनुमान चालीसा लावण्याचे आदेश दिले आहेत.

या पार्श्वभूमीवर हिंगोली (Hingoli) जिल्ह्यांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिस अधीक्षक राकेश कलासागर , सहाय्यक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख , अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांनी तातडीने ठाणेदार यांच्या बैठका घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या.

याशिवाय जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शंभर पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. ध्वनिक्षेपकाचा वापर करताना त्यासाठी दिलेल्या नियमांचे पालन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. तसेच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा देत जिल्ह्यात कडक बंदोबस्त तैनात केला आहे.

दरम्यान, शहरातील धडवाई हनुमान मंदिरात मनसेचे जिल्हाप्रमुख बंडू कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी महाआरती व हनुमान चालीसाचा पठण करण्यात आले. यावेळी मनसेचे शहर प्रमुख संतोष बांगर , संतोष खंदारे, विशाल सांगळे, युवा जिल्हाध्यक्ष रवि मुदिराज, औंढा नागनाथ तालुका अध्यक्ष दिपक सांगळे, विठ्ठल जाधव , कृष्णा पवार , ज्ञानेश्वर वीरकर, सिध्दांत कोकाटे, संजय कोकाटे, भैय्या सोळंके.

MNS Maha Arti In Hingoli
Aurangabad : पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद अन् मराठवाड्यात शांतता ...

गजानन कान्हडे राजू थिटे, आकाश धनमने , गजानन सरकटे, शुभम डोंगरदिवे, गोपाल कड, दिपक वैद्य, नागेश झुलझुले, सचिन पांढरे, बंडू देवडे दशरथ धोत्रे, ऋषिकेश गादेकर, पृथ्वीराज चव्हाण आदींची उपस्थिती होती. राज ठाकरे यांनी आज राज्यातील मनसैनिकांना महाआरती व हनुमान चालीसा लावण्याचे आदेश दिले होते. हिंगोली जिल्ह्यात मात्र सकाळी कुठेही हुनमान चालीसा लावण्यात आली नाही. दुपारी मात्र हिंगोली शहरात मनसेच्या वतीने महाआरती करण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com