MNS President Raj Thackeray : मुंबई, पश्चिम महाराष्ट्रात उमेदवार जाहीर केला, मराठवाड्याचे काय ?

How many Legislative Assembly seats will MNS contest in Marathwada? : छत्रपती संभाजीनगर मतदारसंघ वगळता महायुतीला मराठवाड्यातील सातही लोकसभा मतदारसंघात पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांमध्ये मनसेचा वाटा किती होता? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
MNS President Raj Thackeray
MNS President Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Maharashtra MNS News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुक पुन्हा एकदा स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. महायुती-महाविकास आघाडीत जागा वाटपासाठी चर्चा, बैठका सुरु असताना इकडे राज ठाकरे यांनी दोन उमेदवार जाहीर करत त्यांना देवदर्शनही घडवून आणले. राज ठाकरे यांचा हा वेग पाहता ते येत्या काही दिवसात इतर भागातील उमेदवार जाहीर करतील, असे बोलले जाते.

तर दुसरीकडे राज ठाकरे महायुतीवर दबाव वाढवण्यासाठी उमेदवार घोषित करत आहेत, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 2009 मध्ये स्वबळावर लढलेल्या राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पक्षाने तेरा आमदार निवडून आणत प्रस्थापित पक्षांना धक्का दिला होता. या तेरा पैकी किती आमदार आज त्यांच्यासोबत आहेत हा प्रश्न असला? तरी राज ठाकरे यांची जादू महाराष्ट्रात अजूनही कायम आहे, हे कोणी नाकारू शकणार नाही.

मुंबईतील शिवडी विधानसभा मतदारसंघातून बाळा नांदगावकर आणि पंढरपूर-मंगळवेढातून दिलीप धोत्रे यांच्या उमेदवारीची घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे. त्यानंतर मनसेचा प्रभाव असणाऱ्या मराठवाड्यात ते किती जागा लढवणार? याची उत्सूकता पदाधिकारी, कार्यकर्त्यांना लागली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात मनसेने महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देऊन त्यांच्यासाठी काम केले होते.

MNS President Raj Thackeray
Raj Thackeray Solapur PC : राज ठाकरे पुतण्या आदित्य ठाकरेंच्या विरोधात उमेदवार देणार; मनसेचा वरळीचा उमेदवारही निश्चित!

छत्रपती संभाजीनगर मतदारसंघ वगळता महायुतीला मराठवाड्यातील (Marathwada) सातही लोकसभा मतदारसंघात पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांमध्ये मनसेचा वाटा किती होता? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. गेल्या पाच वर्षात मराठवाडा व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मनसे फारसी सक्रीय दिसली नाही.

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते अॅक्टिव्ह झाले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वबळावर विधानसभा लढण्याचा निर्णय घेत दोन उमेदवार जाहीर केल्याने पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये जोश आला आहे. संभाजीनगर, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, जालना या आठ जिल्ह्यात मनसे उमेदवार देणार का ?

MNS President Raj Thackeray
Video MNS NEWS : मोठी बातमी! मनसेकडून बाळा नांदगावकरांना उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराविरोधात उमेदवारी

कोणत्या मतदारसंघासाठी पक्षाच्या निरीक्षकांनी अनुकूलता दाखवणारा अहवाल पक्षश्रेष्ठींकडे दिला हे अद्याप स्पष्ट नाही. राज्यात सुरू असलेले फोडाफोडीचे राजकारण, शिवसेना-राष्ट्रवादी पक्षामध्ये पडलेली फूट आणि भाजपच्या राजकारणाला कंटाळलेला मतदार सक्षम पर्यायाच्या शोधात आहे. मनसे तो पर्याय ठरु शकतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आगामी महापालिका, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये शिरकाव करायचा असेल, तर मनसेला विधानसभा लढवावीच लागेल. त्यादृष्टीने राज ठाकरे यांनी तयारी सुरू केली आहे. दोन उमेदवार जाहीर करत राज ठाकरे यांनी विधानसभेच्या आखाड्यात उतरण्याची तयारी केली आहे. मराठवाड्यात मरगळ आलेल्या मनसेसाठी विधानसभेची निवडणूक बुस्टर डोस ठरू शकते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com