बीड ः महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी मृत्यूदंडासह इतर कठोर तरतुदींसह शक्ती कायदा येत आहे. (Beed) या कायद्याचे स्वागत करतांनाच एक महिला प्रतिनिधी म्हणून मला काही सूचना कराव्या वाटतात. अत्याचार पिडित महिला जेव्हा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार द्यायला येते, तेव्हा तिच्याशी कसे वागावे?(Bjp) याचे प्रशिक्षण पोलिसांना देण्यासाठी विशेष वर्ग घेण्यात यावे, अशी मागणी केजच्या भाजप आमदार नमिता मुदंडा (Namita Mundada)यांनी विधीमंडळाच्या सभागृहात केली.
माझ्या बीड जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झालेली आहे, तेव्हा गृहविभागाने जर अशा प्रशिक्षणाची सरुवात करण्याचा निर्णय घेतला, तर त्याची सुरूवातच बीडपासून करावी, अशी मागणीही मुंदडा यांनी केली. विधानसभेत आज महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या शक्ती कायद्यावर चर्चा झाली.
केजच्या भाजप आमदार नमिता मुंदडा यांनी या चर्चेत सहभाग घेत काही सूचना केल्या. मुंदडा म्हणाल्या, महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार रोखण्यासाठी सर्वात आधी या महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे. ज्या महिलेवर अत्याचार झालेला असतो ती मानसिकरित्या पुर्णपणे कोलमडलेली असते. त्यामुळे ती जेव्हा पोलीसांत तक्रार देण्यासाठी येते तेव्हा तिला विश्वासात घेऊन मानसिक आधार देण्याची गरज असते.
मात्र या उलट त्या महिलेकडे वेगळ्या नजरेने बघितले जाते. तिच्यावरच अनेक प्रश्नांचा भडीमार करून तिने तक्रारच करू नये, असे वातावरण पोलिस ठाण्यांमध्ये निर्माण केले जाते. त्यामुळे अनेक महिला तक्रारीसाठी पुढे येत नाही. तेव्हा अत्याचार पिडित महिलांशी पोलिसांनी कसे वागावे याचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे. तसेच या प्रशिक्षणाची सुरूवात माझ्या बीड जिल्ह्यातून करावी, अशी मागणी नमिता मुंदडा यांनी केली.
पिडित महिलांची चौकशी करण्यासाठी पोलिस ठाण्यात स्वंतत्र महिला विंग असली पाहिजे, ज्यामुळे या महिलांना सुरक्षित वाटून योग्य चौकशी होईल. पिडित महिलेचा सन्मान राखला गेला पाहिजे, यासाठी तिच्या तपासण्या, चौकशी घरी येऊन केली पाहिजे, जेणेकरून पिडित महिलेवर कोणत्याही प्रकारचा दबाव आणि भिती राहणार नाही. शिवाय तक्रारदार महिलेच्या सुरक्षेच्या दृष्टीने तिला पोलिस संरक्षण देखील तातडीने पुरवले गेले पाहिजे.
अत्याचाराच्या प्रकरणात अनेकदा आरोपी हे जवळचे, ओळखीचे किंवा नातेवाईक निघतात. अशावेळी महिला व मुलींना स्वसंरक्षणाचे धडे शालेय स्तरातूनच दिले गेले पाहिजे, अशी अपेक्षाही मुंदडा यांनी व्यक्त केली. अत्याचर पिडित महिलांना दिली जाणारी मदत वर्षानुवर्षे मिळत नाही, ती तातडीने मिळावी, अशी मागणी देखील मुंदडा यांनी यावेळी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.