औरंगाबाद : राज्यातील सत्तातंरानंतर सप्टेंबर मध्ये झालेल्या राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरल्याचा दावा केला गेला. तर त्याखालोखाल राष्ट्रवादी, शिवसेना, शिंदे गट आणि काॅंग्रेसला यश मिळाले होते. आता राज्यातील साडेसात हजाराहून अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका येत्या १८ डिसेंबरला होत आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे-फडणवीस सरकार एकमेकांच्या समोर उभे ठाकणार आहेत.
मराठवाड्यातील (Marathwada) २१५९ ग्रापंचायतीसाठी देखील १८ डिसेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुका म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व २०२४ च्या विधानसभा, लोकसभा निवडणुकीसाठीच्या लिटमस टेस्ट ठरणार असल्याचे बोलले जाते. त्यामुळे या ग्रापंचायत (Grampanchyat) निवडणुकीकडे सगळ्याच राजकीय पक्षांचे लक्ष असणार आहे.
गावच्या कारभारावर वर्चस्व मिळवणारे पक्षच पुढे स्थानिक स्वराज्य व लोकसभा विधानसभा निवडणुकीत महत्वाची भूमिका वठवणार आहेत. या शिवाय मराठवाड्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची देखील या निमित्ताने ही चाचपणी असणार आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या आठही जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा उडणार आहे.
यात औरंगाबाद -२०९, बीड-७०४, जालना-३०६, नांदेड-२३३, परभणी-१२८, उस्मानाबाद १६६, हिंगोली ६२ तर सर्वाधिक ३५१ लातूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. राज्यातील सत्तातंरानंतर दुसऱ्या टप्यातील या ग्रामपंचायत निवडणुकीकडे सगळ्याच राजकीय पक्षांचे लक्ष असून त्या जिंकण्यासाठी स्थानिक नेते कामाला लागले आहेत.
जिल्हा व तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या
औरंगाबाद : गंगापूर ३५, खुलताबाद १०, पैठण २२, फुलंब्री १८, सिल्लोड १८, वैजापूर २५, औरंगाबाद २५, कन्नड ५१, सोयगाव ५,
बीड : अंबाजोगाई ८३, आष्टी १०९, बीड १३२, धारुर ३१, गेवराई ७६, केज ६६, माजलगाव ४४, परळी ८०, पाटोदा ३४, शिरुर कासार २४, वाडवणी २५
हिंगोली : औंढा नागनाथ ७, वसमत १३, हिंगोली १६, कळमनुरी १६, सेनगाव १०
जालना : अंबड ४०, घनसावंगी ३४, जाफ्राबाद ५५, जालना २९, परतूर ४१, भोकरदन ३२, मंठा ३५
लातूर: अहमदपूर ४२, औसा ६०, चाकुर ४६, जळकोट १३, लातूर ४४, निलंगा ६८, शिरुर अनंतपाळ ११, उदगीर २६, देवणी ८, रेनापूर ३३
उस्मानाबाद : भूम २, कळंब ३०, लोहारा १३, उस्मानाबाद ४५, परांडा १, तुळजापूर ४८, उमरगा २३, वाशी ४
परभणी : गंगाखेड १३, जिंतूर ३३, मानवत ८, पालम ११,परभणी २९, पाथरी ७, पूर्णा १३, सेलू ११, सोनपेठ ३,
नांदेड : अर्धापूर २, उमरी १, कंधार १६, किनवट ५३, देगलूर १, धर्माबाद ३, नांदेड ७, नायगाव ८, बिलोली ९, भोकर ३, माहूर २७, मुखेड १५, मुदखेड १, लोहारा २८, हदगाव ६, हिमायतनगर १
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.