मी केजकरांची सुन; तुम्हाला दुसऱ्याच्या दारात जाऊ देणार नाही

विकास करण्याची तळमळ ही त्या गावाशी नाळ जोडलेली असेल तर होते. ही नाळ आमच्या पाटील कुटुंबाची जोडलेली आहे. (Mp Rajani Patil)
Mp Rajni Patil

Mp Rajni Patil

Sarkarnama

Published on
Updated on

बीड : मी केजकरांची सून असून माझं घर आणि कुटूंब केज आहे. घर सांभाळण्याची व घर टापटीप ठेवण्याची जबाबदारी माझी आहे. (Mp Rajani Patil) केजकरांनी घाबरण्याचे कारण नाही, केजकरांना कुठल्याच (Congress) गोष्टीसाठी दुसऱ्याच्या दारात जाण्याची गरज पडू देणार नाही, असा विश्वास खासदार रजनी पाटील यांनी (Beed) उपस्थितांना दिला.

केज नगर पंचायत निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेत सोमवारी त्यांनी केजकरांना भावनिक हाक दिली. केजच्या व्यापारी संकुलाचा प्रश्न एक वर्षात मार्गी लावू, केजमध्ये आमचे आजत सासरे, सासरे व पती अशोक पाटील यांनीच अत्यावश्यक असलेल्या पाणी योजना, वीज, रस्ते, ग्रामीण रुग्णालय उभारणी अशी कामे केल्याचा दावाही पाटील यांनी केला.

येणाऱ्या काळात देखील आम्हीच केजचा विकास करू. बाहेरचा माणूस येऊन केजचा विकास करू शकत नाही. विकास करण्याची तळमळ ही त्या गावाशी नाळ जोडलेली असेल तर होते. ही नाळ आमच्या पाटील कुटुंबाची जोडलेली आहे. शहरात आता वाढीव पाईपलाईनचा प्रस्ताव मंजूर आहे. परंतु मधल्या काळात कोरोनामुळे ही कामे प्रलंबीत होती ती आता सुरू होतील.

आगामी काळात शहरात बाल उद्यान, प्रत्येक वॉर्डात शुद्ध पाण्याचे प्लँट, भव्य क्रीडा संकुल, नाट्यगृह याची उभारणी होईल. यासाठी योग्य जागांची चाचपणी सुरू आहे. महिलांसाठी लघु व गृह उद्योग आपण तातडीने सुरू करणार आहोत. निराधारांना योजना मंजूरीचे काम आमच्या कार्यकर्त्यांनी केले. यापुढेही केले जाईल.

<div class="paragraphs"><p>Mp Rajni Patil</p></div>
ईडी लाव, नाही तर काडी लाव ; पण तुला जेलची हवा खायला लावणार

आम्ही निःपक्षपातीपणे काम करतो. केजचे काम करणं म्हणजे आम्ही काही उपकार करत नसून ते आमचे कर्तव्य आहे. माजी मंत्री अशोक पाटील यांनीही टायगर अभी जिंदा है म्हणत विरोधकांवर तोफ डागली.

अशोक पाटील कुठे दिसतच नाहीत, येतच नाहीत, या आरोपावर वाघ कुठेही दिसत नसतो तो कधीतरी दिसतो असे म्हणत त्यांनी टोला लगावला. काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, माजी नगराध्यक्ष आदित्य पाटील, सुरेश पाटील, राहुल सोनवणे आदींची उपस्थिती होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com