Imtiaz Jalil On Haj House : उद्घाटन मी पण करू शकतो, पण मुख्यमंत्र्यांकडून करण्यात माझा स्वार्थ..

Aurangabad : हज हाऊसच्या उद्घाटनाला मुख्यमंत्र्यांनी यावे, यासाठी मी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना बोललो आहे.
Mp Imtiaz Jalil-Cm Eknath Shinde News, Aurangabad
Mp Imtiaz Jalil-Cm Eknath Shinde News, AurangabadSarkarnama
Published on
Updated on

Aimim : हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांना सर्व सोयीसुविधांनी युक्त असे भव्य हज हाऊस छत्रपती संभाजीनगरात तयार आहे. परंतु केवळ उद्घाटनाअभावी या वास्तूचा वापर हज यात्रेकरूंना करता येत नाहीये. (Imtiaz Jalil On Haj House) त्यामुळे हज हाऊसचे उद्घाटन कधी करणार? असा प्रश्न सातत्याने विचारला जातो.

Mp Imtiaz Jalil-Cm Eknath Shinde News, Aurangabad
Harshvardhan Jadhav On Onion : तेलंगणाला कांदा विकतोय म्हणून इज्जत जातेय ? मग द्या भाव अन् अनुदान..

यावर खासदार म्हणून मी देखील हज हाऊसचे उद्घाटन करू शकतो, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ते व्हावे, असे मला वाटते. (Aurangabad) कारण हज हाऊसच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात मला त्यांच्याकडून आमखास मैदानवर भव्य स्टेडियम उभारण्याची घोषणा करून घ्यायची आहे, असे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.

पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांचा (Eknath Shinde) ग्रामीण भागात दौरा आहे,तेव्हाच हज हाऊसचे उद्घाटन करण्याचा आपला प्रयत्न असून या संदर्भात आपण विभागीय आयुक्त सुनील केंद्रकर यांच्याशी बोललो असल्याचे इम्तियाज यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले. (Imtiaz Jalil) इम्तियाज जलील म्हणाले, आमखास मैदानावर मुलांसाठी स्टेडिअम बनवण्याचे माझे स्वप्न आहे. परंतु ही जागा कुणाची यावरून सरकार दरबारी वाद सुरू आहे.

या स्टेडियमाठी राज्य सरकारचा एक रुपया देखील आम्हाला नको आहे, निधी केंद्रातून आणण्याची माझी जबाबदारी. राज्य सरकारने फक्त कागदोपत्री ही जागा आम्हाला स्टेडियमसाठी द्यावी. दावा सांगणाऱ्यांनी अन्य जागेचा पर्याय सूचवावा, त्यांना आम्ही ती देवू. परंतु आमखास मैदानाची एक इंचही जागा आम्ही देणार नाही, तिथे खेळांडूसाठी मैदानाच बनेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हज हाऊसच्या उद्घाटनाला मुख्यमंत्र्यांनी यावे, यासाठी मी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना बोललो आहे. ते पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांना हज हाऊसच्या उद्घाटनाला आणतील. याच कार्यक्रमात आमखास मैदानावरील नियोजित स्टेडियमची घोषणा देखील त्यांनी करावी, असा माझा प्रयत्न असणार आहे, असेही इम्तियाज जलील यांनी सांगितले. जालना रोड येथील चारशे खाटांच्या रुग्णालयाची फाईल संबंधित मंत्र्यांनी दाबून ठेवली असल्याचा आरोप देखील इम्तियाज जलील यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com