काॅंग्रेसमध्ये तिकीटासाठी खूप कसरत करावी लागते, मला रात्री एक वाजता फोन आला होता..

गेल्यावेळी विधानसभेच्या तिकिटासाठी मुलाखती झाल्या, पण निरोप काही येत नव्हता. मध्यरात्री एक वाजता माझे तिकीट फायनल झाले. (Amit Deshmukh)
Medical Education Minister Amit Deshmukh
Medical Education Minister Amit DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : पक्षात प्रामाणिकपणे काम केल्याशिवाय तुमची दखल घेतली जात नाही. त्यामुळे भविष्यात तुम्ही किती डिजिटल सदस्यांची नोंदणी केली यावरच पुढील भवितव्य अंवलबून आहे, असे बजावतांना काॅंग्रेसमध्ये (Congress) तिकीटासाठी खूप कसरत करावी लागते, गेल्या विधानसभेच्या वेळी मुलाखत होऊन देखील मला शेवटपर्यंत निरोप आला नव्हता, रात्री एक वाजता फोन आल्याची आठवण वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी सांगितली.

काँग्रेसच्या डिजिटल सदस्य नोंदणी अभियानाच्या मराठवाडा (Marathwada) विभागाची आढावा बैठक आज औरंगाबादेत पार पडली. यावेळी अमित देशमुख यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना चार्ज करण्यासाठी काही अनुभव किस्से सांगितले. ते म्हणाले, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कामाला लागले पाहिजे.

डिजिटल सदस्य नोंदणीसाठी केवळ एक महिना शिल्लक आहे. यापुढे कुठल्याही निवडणुकीत तिकीट मिळविण्यासाठी तुम्ही किती सदस्य केले? अशी विचारणा होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करून महाराष्ट्र देशात एक नंबरवर राहील, याची काळजी घ्या. कॉंग्रेसमध्ये तिकीट मिळविण्यासाठी खूप कसरत करावी लागते.

गेल्यावेळी विधानसभेच्या तिकिटासाठी मुलाखती झाल्या, पण निरोप काही येत नव्हता. मध्यरात्री एक वाजता माझे तिकीट फायनल झाले. असाच अनुभव प्रणिती शिंदे यांना देखील आला,त्यांना रात्री दोन वाजता तिकीट अंतिम झाल्याचा निरोप आला होता.

Medical Education Minister Amit Deshmukh
Amit Deshmukh : देशातील महाविकास आघाडीचे नेतृत्व राहुल गांधीच करतील

डिजिटल सदस्य नोंदणीमुळे तळागाळातील कार्यकर्त्यांची नावे थेट सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यापर्यंत पोचणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करून औरंगाबाद जिल्हा टॉप फाईव्हमध्ये आणण्याचे आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com