Minister Sanjay Rathod On Thackeray News : मी उद्धव ठाकरेंसोबतच राहणार होतो, पण महंतांच्या सल्ल्यामुळे शिंदेंसोबत गेलो...

Maharashtra : आपण सरकारमध्ये असलो तर आपल्याला समाजाचे प्रश्न सोडवता येतील, यासाठी महंतांनी मला हा सल्ला दिला होता.
Minister Sanjay Rathod On Thackeray News
Minister Sanjay Rathod On Thackeray News Sarkarnama

Beed News : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा शिवसेनेत बंड झाले, तेव्हा मी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार होतो. (Minister Sanjay Rathod On Thackeray News) परंतु उद्धव ठाकरे यांचे सरकार पु्न्हा येणार नाही, समाजाचे प्रश्न सोडवायचे असेल तर सत्ते राहिलं पाहिजे, असा सल्ला समाजाच्या संत महंतांनी मला दिला होता. त्यानंतरच आपण गुवाहाटीला जावून शिंदे गटात सामील झालो, अशी स्पष्ट कबुली राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी दिली.

Minister Sanjay Rathod On Thackeray News
Mp Imtiaz Jalil On Ram Temple : एक मंदिर वाचवून मी हजारो मशिदी वाचवल्या...

बीड (Beed) जिल्ह्यातील गेवराई येथे आयोजित बंजारा समाजाच्या मेळाव्यात ते बोलत होते. सरकारसोबत संघर्ष केल्याशिवाय बंजारा समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत, असेही राठोड (Sanjay Rathod) म्हणाले. सरकारने वंसतराव नाईक यांच्या नावाने महामंडळ स्थापन केले, पण त्याला निधीच दिला नाही. हा वसंतराव नाईक यांचा अपमान आहे. बंजारा समाजाचे प्रश्न खऱ्या अर्थाने सोडवायचे असतील तर आपल्याला सरकारसोबत संघर्ष करावा लागणार आहे.

आजही अनेक तांड्यांवर पक्के रस्ते नाहीत, शाळा नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. मोठ्या प्रमाणात ऊस तोडीसाठी जाणाऱ्या बंजारा समाजावर अन्याय-अत्याचार होतात. हे रोखायचे असेल तर येत्या काळात आपल्याला सरकारसोबत संघर्ष करावा लागेल. (Uddhav Thackeray) बंजारा समाजातील तरुणांना व्यवसायाच्या संधी मिळाव्यात, त्यांना आत्मनिर्भर होता यावे, यासाठी सरकारने वसंतराव नाईक महामंडळाची स्थापना केली. मात्र या मंडळाला कुठलाच निधी दिला नव्हता. त्यामुळे सरकारकडून वसंतराव नाईक यांचा अपमान झाला.

या महामंडळाला दीड हजार कोटी रुपये देऊन बंजारा समाजातील तरुणांना व्यवसायासाठी सरकारने मदत केली पाहिजे. अन्यथा या महामंडळाचे नाव बदलावे, असेही राठोड म्हणाले. मी माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर काही काळातच सरकारमध्ये मोठी उलथापालथ झाली.

यावेळी मी देखील उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता, मात्र बंजारा समाजातील काही नेते आणि महंतांच्या सांगण्यावरून आपण शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. आपण सरकारमध्ये असलो तर आपल्याला समाजाचे प्रश्न सोडवता येतील, यासाठी महंतांनी मला हा सल्ला दिला होता, असा दावा देखील राठोड यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com