Aurangabad News : मराठवाडा शिक्षक मतदार संघ निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर divisional commissioner यांनी निवडणुक अधिकारी, कर्मचाऱ्यांना सज्जड दम दिला आहे. निवडणुक कामात बेजबाबदारपणा खपवून घेतला जाणार नाही, अशा शब्दात त्यांनी संबंधितांची कानउघाडणी केली आहे.
आज निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रेकरांसह ,जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी मतमोजणी स्थळ व स्ट्रॉंग रूमची संयुक्त पाहणी केली. (Aurangabad) येत्या आठ दिवसात मतमोजणी केंद्रात सोयी सुविधा उपलब्ध करून मतमोजणी केंद्र सज्ज ठेवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. (Marathwada)
दरम्यान निवडणूक कामात कोणत्याही प्रकारचा बेजबाबदारपणा आणि दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही,असा इशारा त्यांनी दिला. मराठवाडा शिक्षक मतदार संघातील निवडणूक येत्या ३० जानेवारी २०२३ रोजी होत असून मतमोजणी २ फेब्रुवारी रोजी होणार आहे .या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी औरंगाबाद कलाग्राम समोरील एमआयडीसी चिकलठाणा येथे करण्यात येणाऱ्या मतमोजणी केंद्राची व स्ट्रॉंग रूमची केंद्रकरांनी पाहणी केली.
तसेच विविध कामांच्या सूचना दिल्या. मतमोजणीच्या अनुषंगाने ज्या ज्या काही सोयी सुविधा उपलब्ध करावयाच्या आहेत त्या तातडीने करा, आजपासून कामाला लागा. निवडणुकीचे काम असल्याने या कामात कुठल्याही प्रकारची दिरंगाई व बेजबाबदारपणा खपवून घेणार नाही.
आठ दिवसात मतमोजणी केंद्राची स्वच्छता, विद्युत, पाणी, मतमोजणी व्यवस्था ,पार्किंग व्यवस्था, आदी उपलब्ध करून सुरक्षा व्यवस्था कडक ठेवा. आठ दिवसानंतर मतमोजणीची पूर्वतयारी पाहणी पुन्हा करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. यावेळी निवडणुक विभागाचे अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस अधिकारी आदि उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.