Sandeep Kshirsagar Speech : शेवटच्या श्वासापर्यंत शरद पवारांच्या पायाशी राहीन; संदीप क्षीरसागरांचे भावनिक भाषण

Sharad Pawar Rally : पहिल्या २०१९ च्या पहाटेच्या शपथविधीवेळी मला जयंत पाटील यांनी फोन केला होता. त्यावेळी शरद पवारांकडे परत येणारा पहिला आमदार मी होतो.
Sandeep Kshirsagar
Sandeep KshirsagarSarkarnama
Published on
Updated on

Beed News : मला काकूंनी (केशरकाकू क्षीरसागर) हयात असताना सांगितलं होतं की ‘आपण शरद पवार यांच्यासोबत राहण्याची भूमिका घेतलेली आहे. कायमस्वरुपी त्यांच्या पायाशी राहा. त्यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत पवारसाहेब तुमच्याच पायाशी राहीन असा शब्द देतो, असे भावनिक भाषण आमदार संदीप क्षीरसागर यांनी केले. (I will stand by Sharad Pawar's feet till my last breath : Sandeep Kshirsagar)

बीडमध्ये स्वाभिमान सभेचे आयोजन करण्यात आले. त्या सभेत आमदार संदीप क्षीरसागर बोलत होते. ते म्हणाले की, बीड जिल्ह्यातील काही लोकांचा गैरसमज झालेला आहे. काही लोक आपल्याला सोडून गेले तरी काय फरक पडणार नाही. कारण, सर्वसामान्य जनता पवारसाहेबांसोबत आहे. मला सत्ता की साहेब असा प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी तो प्रश्न संपण्याच्या अगोदरच मी ‘साहेब’ असं म्हटलं होतं.

देशाची भूमिका ठरविण्याचा मान बीडला दिल्याबद्दल शरद पवारांचे धन्यवाद मानतो. राजकारणात भूमिका महत्वाची असते. आम्ही जेव्हा बीडमध्ये नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला आघाडी केली होती, त्यावेळीही काहीही झालं तर आम्ही शरद पवार यांच्यासोबत आहोत, अशी भूमिका जाहीर केली होती. त्याला बीडची जनता साक्षीदार आहे. माझी पंचायत समिती गेली, जिल्हा परिषद धुडकावून लावली पण आम्ही पवारांना सोडले नाही, असेही संदीप क्षीरसागर यांनी नमूद केले.

Sandeep Kshirsagar
Jayant Patil On Ajit Pawar: अजित पवार मुख्यमंत्री होण्याचा प्रश्न आजतरी दिसत नाही; जयंत पाटलांचे भाष्य

ते म्हणाले की, शरद पवार यांनी मला विधानसभेचे तिकिट दिले, त्यांच्या आशीर्वादामुळेच मी विधानसभेला निवडून आलो. सध्याच्या पंचवार्षिकला परिस्थिती जरा वेगळी दिसत आहे. दरवर्षी सरकारं बदलत आहेत. पहिल्या २०१९ च्या पहाटेच्या शपथविधीवेळी मला जयंत पाटील यांनी फोन केला होता. त्यावेळी शरद पवारांकडे परत येणारा पहिला आमदार मी होतो.

आताही मी सोशल मीडियातून माझी भूमिका पहिल्यांदा जाहीर केली. मी भूमिकेबाबत काय बोलतो तर निवडणुकीच्या वेळी पक्षाची एक भूमिका असते, त्या भूमिकेलाच लोक मतं देत असतात. पवारांच्या पुरोमागी विचारालाच मतं देतात. मला तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष केले. पण मी आमदार झाला त्यापेक्षा जास्त सत्कार जिल्हाध्यक्ष निवडीनंतर झाले, असेही क्षीरसागर यांनी नमूद केले.

Sandeep Kshirsagar
Sharad Pawar Beed Rally : पवारांच्या सभेसाठी धनंजय मुंडेंच्या परळीतून ७०० गाड्या रवाना; हा नेता करणार राष्ट्रवादीत प्रवेश

आमदार क्षीरसागर म्हणाले की, बीड जिल्ह्यात मी एकटाच आमदार होतो. आम्ही बैठकी घ्यायला निघालो. त्यावेळी दरेकर, उषा दराडे, सलीमभाई, बाळासाहेब हुके पाटील हे सर्वजण प्रत्येक बैठकीला उपस्थित असायचे. बैठकीचे रुपांतर सभेत व्हायचे. मी एका दिवसात लोकप्रिय कसा झालो, हे मला कळेना. पण नंतर लक्षात आलं की ही माझी जादू नाही, ही तर पवारसाहेबांची जादू आहे.

Sandeep Kshirsagar
Ghodganga Sugar Factory : अजितदादांचा फॉर्म्युला मान्य करावा; अशोक पवारांचे आवाहन, ‘घोडगंगा’चे कामगार मात्र संपावर ठाम...

काही लोक म्हणाले की ‘आम्ही सत्तेत आहेात. आमच्यासोबत मोदी आहेत, तुमच्याकडे काय आहे. त्यावेळी मी त्यांना सांगितले की, आमच्याकडे साहेब आहेत. बीड आणि मराठवाड्याची जनता स्वभिमानी आहे. आयुष्यभर तुमच्यासोबत तुमच्या विचारांसोबत राहील, असेही क्षीरसागार यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com