Chikhlikar-Shinde Nanded Politics : अशोक चव्हाणांना जमले, ते प्रताप पाटील, श्यामसुंदर शिंदेंना जमेल का ?

Nanded Political News : मोठी झेप घेण्यासाठी चव्हाणांनी दोन पावलं मागे जाण्याचे धोरण स्वीकारले. चिखलीकर-शिंदेंना हे जमणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
MP Chikhlikar-MLA Shaymsunder Shinde News
MP Chikhlikar-MLA Shaymsunder Shinde NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Political News : राजकारणात भाऊबंदकी, काका-पुतणे, आजोबा नातू, भाऊ-बहीण अशा विविध नातेसंबंधांची किनार आणि परंपरा राहिलेली आहे. अनेक नेत्यांनी राजकीय वैर आणि वैयक्तिक संबंध याच्यात कधी गल्लत होऊ दिली नाही. (Nanded Politics) तर काहींनी राजकीय संबंधासोबतच वैयक्तिक संबंधही कायमचे बिघडवले. नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात अशाच नाजूक नात्याला गेल्या काही वर्षांपासून वादाची किनार लागल्याचे पाहायला मिळते.

MP Chikhlikar-MLA Shaymsunder Shinde News
Sharad Pawar In Killari : पवारांच्या कृतज्ञता सोहळ्यात सुळेंनी विलासरावांबरोबरच पद्मसिंह पाटलांचीही आठवण काढली

नांदेडचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhlikar) आणि त्यांचे मेहुणे लोहा-कंधार मतदारसंघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे. या दोघांच्या नात्यातील दुरावा कमी होण्याऐवजी वाढतानाच दिसतो आहे. (BJP) चिखलीकर आणि शिंदे हे दोघेही आपापल्या मतदारसंघात भक्कम आणि ताकदवान नेते म्हणून ओळखले जातात. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भविष्यातील राजकीय धोके ओळखून मेहुणे भास्कर पाटील खतगावकर यांच्याशी जुळवून घेत त्यांना पुन्हा काॅंग्रेसमध्ये आणले. मोठी झेप घेण्यासाठी चव्हाणांनी दोन पावलं मागे जाण्याचे धोरण स्वीकारले. चिखलीकर-शिंदेंना हे जमणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

नांदेड (Nanded) जिल्ह्यात शेकापची ताकद क्षीण होत असताना ती वाढवण्याचे काम आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी कंधार- लोहा विधानसभा मतदारसंघात केले. तसा हा मतदारसंघ शेकापचा बालेकिल्ला, याच मतदारसंघातून सलग पाचव्यांदा दिवंगत नेते भाई केशवराव धोंडगे हे निवडून आले होते. देशातील आणीबाणी उठल्यानंतर झालेल्या निवडणुकीत ते खासदार म्हणून निवडून आले होते. या शेकापच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला तो शिवसेनेने १९९५ मध्ये. या मतदारसंघातून सलग दोन वेळा रोहिदास चव्हाण हे शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते.

त्यानंतर तब्बल २४ वर्षांनंतर शेकापच्या तिकिटावर आमदार श्यामसुंदर शिंदे निवडून आले. ते राज्यातील गेल्या निवडणुकीत निवडुन आलेले शेकापचे एकमेव आमदार आहेत. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकरांचे आमदार श्यामसुंदर शिंदे हे मेहुणे आहेत. या नाजूक नात्यात गेल्या काही महिन्यांपासून दरी निर्माण झाली आहे. राजकीय मतभेद टोकाला गेल्याने छोट्या मोठ्या निवडणुकीत, जाहीर सभेत एकमेकांवर टीका टिप्पणी, आरोप-प्रत्यारोपांमुळे जिल्ह्यात या दोन्ही नेत्यांची चर्चा सातत्याने होत असते.

जसजशा निवडणुका जवळ येतील तसा हा तेढ वाढण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत काही शेतकरी कामगार पक्षाची मजबूत पकड होती. यात नांदेड जिल्हाचाही समावेश होतो. नांदेड जिल्ह्यातील कंधार-लोहा या विधानसभा मतदारसंघात भाई केशवराव धोंडगे यांचे खूप मोठे वर्चस्व राहिले आहे. ते उभ्या महाराष्ट्राला आगळे-वेगळे आंदोलन करण्यासाठी परिचित होते. केशवराव सहा वेळा आमदार व‌ एकदा खासदार म्हणून निवडून आले होते. नंतर मात्र शिवसेने कंधार- लोह्यात पक्षाचे संघटन वाढवले.

MP Chikhlikar-MLA Shaymsunder Shinde News
Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakh : महाराजांची वाघनखं फक्त तीन वर्षांसाठीच महाराष्ट्रात ? मुनगंटीवार म्हणाले...

गेल्या निवडणुकीत श्यामसुंदर शिंदे यांनी पुन्हा हा मतदारसंघ शेतकरी कामगार पक्षाकडे खेचून आणला. त्याआधी त्यांनी विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून युतीचा उमेदवार म्हणून निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत त्यांचा काँग्रेसचे उमेदवार माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांनी पराभव केला होता. त्यानंतर जिल्ह्याच्या राजकारणात खासदार प्रतापराव चिखलीकर व आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी एकमेकांना पूरक असे राजकारण केले आहे.

पण गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर काही काळानंतर पुन्हा दोघांमध्ये कटुता निर्माण होण्यास सुरुवात झाली. लोहा-कंधार मतदारसंघातून खासदार चिखलीकर यांना आपला मुलगा प्रवीण याला उमेदवारी द्यायची होत, तर श्यामसुंदर शिंदे हेही याच मतदारसंघातून लढण्यास इच्छूक होते. यावरूनच दोघांमध्ये वादाला सुरुवात झाली आणि या दोन नेत्यांमध्ये कटुता दिवसेंदिवस वाढतच गेली. मग एकमेकांना कार्यक्रमात बोलावणे टाळणे असे प्रकार, कधी जाहीर कार्यक्रमांतून टीका यामुळे हे संबंध अधिकच ताणले गेले. अशीच परिस्थिती राहिली तर येणाऱ्या निवडणुकीत दोघांनाही फटका बसू शकतो.

MP Chikhlikar-MLA Shaymsunder Shinde News
Bhandara OBC News : पितृपक्षात ओबीसी करणार नाहीत पूजा विधी, कारण...

कंधार-लोहा विधानसभा मतदारसंघातील पुढील वर्षात होणारी निवडणूक लक्षवेधी होईल. त्याच्या ठिणग्या आताच पडू लागल्या आहेत. कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत चिखलीकर गटाने बाजी मारली, तर लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आक्टोबरमध्ये होणार आहे.

या निमित्ताने खासदार प्रताप चिखलीकरांचे पॅनल व महाविकास आघाडीचे पॅनल यामध्ये सरळ लढत होणार आहे. महाविकास आघाडीच्या पॅनलमध्ये आमदार श्यामसुंदर शिंदे यांचे उमेदवार राहणार आहेत. त्यामुळे लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com