MLA Sandip Kshirsagar News : कार्यकर्त्यांवर अन्याय होत असेल तर आक्रमक व्हावेच लागते! पण दीड वर्षापुर्वीची क्लीप आताच कशी ?

MLA Sandeep Khirsagar responds to the viral audio clip, stating that if injustice is happening to workers, one must be aggressive in fighting back. : तत्कालीन बीडचे तहसिलदार सुरेंद्र डोके यांना आमदार संदीप क्षीरसागर फोन वरून धमकावत असल्याची आॅडिओ क्लीप काल समाज माध्यमावर व्हायरल झाली होती.
MLA Sandip kshirsagar  News
MLA Sandip kshirsagar NewsSarkarnama
Published on
Updated on

Beed News : सध्या बीड जिल्ह्यात जे प्रकरण सुरू आहे, त्यावरून फोकस हटवण्यासाठी माझी दीड वर्षापुर्वीची आॅडिओ क्लीप व्हायरल करण्यात आली आहे. माझ्या कार्यकर्त्यांवर जर अन्याय होत असेल तर त्याला न्याय मिळवून देण्यासाठी आमदार म्हणून मला आक्रमक पावित्रा घ्यावाच लागतो, अशा शब्दात आमदार संदीप क्षीरसागर यांनी तहसीलदारांना धमकी दिल्याच्या आॅडिओ क्लीपचे समर्थन केले.

तत्कालीन बीडचे तहसिलदार सुरेंद्र डोके यांना आमदार संदीप क्षीरसागर (Sandip Kshirsagar) फोन वरून धमकावत असल्याची आॅडिओ क्लीप काल समाज माध्यमावर व्हायरल झाली होती. यावर आज स्पष्टीकरण देत क्षीरसागर यांनी ती क्लीप दीड वर्षापुर्वीची असल्याचे म्हटले आहे. कार्यकर्त्यांवर अन्याय होतं असेल, आमदार म्हणून अनेक तक्रारी करुन दखल घेतली जात नसेल तर आक्रमक पवित्रा घ्यावाच लागेल.

ही ऑडिओ क्लिप आजची नाही, दीड वर्षापूर्वीच आहे ती आजचं का समोर आली? तर दुसऱ्या प्रकरणावरून फोकस हटवण्यासाठी असे विषय हाती घेतले जात आहेत. (Beed News) संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी हत्येच्या वेळी हसत आहेत. या प्रकरणात आपल्याला काहीच होणार नाही, हे त्यांना माहित होतं. भ्रष्ट अधिकारीच अशा लोकांना पाठीशी घालतात.

MLA Sandip kshirsagar  News
MLA Sandip Kshirsagar News : बीडमध्ये ऑडिओ-व्हिडिओ 'वाॅर'! आमदार संदीप क्षीरसागर यांनी तहसीलदाराला धमकी दिल्याची क्लीप व्हायरल..

बीडची जिल्ह्यात नवीन एसपी आल्यामुळे दोन नंबरचे धंदे बंद झाले आहेत, असा दावाही क्षीरसागर यांनी केला. सतीश भोसले उर्फ खोक्या प्रकरणावरून विरोधकांकडून धस यांना टार्गेट केलं जातयं का? या प्रश्नावर धस यांनी चुकीचं असेल त्यावर कारवाई करा, अशी भूमिका यापूर्वीच जाहीर केली आहे. आपलीही तिच भूमिका असल्याचे संदीप क्षीरसागर यांनी म्हटले आहे.

MLA Sandip kshirsagar  News
Satish Bhosale Viral video : व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर धसांच्या कार्यकर्ताचं स्पष्टीकरण

आणखी एका व्हिडिओची चर्चा..

बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांकडून शोरूमच्या मॅनेजरला मारहाण करण्यात आली असल्याचा आरोप एक व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल करत केला जात आहे. दरम्यान, शोरूमच्या मॅनेजरला मारहाण करणारे माझे कार्यकर्ते नव्हते, असे संदीप क्षीरसागर यांनी स्पष्ट केले. मॅनेजरला मारणारे नाही तर वाचवणारे माझे कार्यकर्ते असल्याचा दावा त्यांनी केला. हा व्हिडीओ तीन महिने जुना असल्याचे सांगत ज्या मॅनेजरला मारहाण झाली त्याने तेव्हाच तक्रार करायला हवी होती, असेही ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com