DCM Ajit Pawar Speech : केंद्रात ज्याचे सरकार त्याच पक्षाचे राज्यात असेल तर कामे होतात..

NCP News : वित्त विभाग माझ्याकडे आहे, त्यामुळे निधी द्यायला अडचण येवू देणार नाही. पण जे काम कराल ते दर्जेदार असले पाहिजे.
Ajit Pawar News
Ajit Pawar NewsSarkarnama
Published on
Updated on

Aurangabad NCP News : आम्हाला काम करण्याची आवड आहे, विकास हाच आमचा ध्यास आहे. त्यामुळे काही निर्णय मी घेतला, त्याला तुम्ही सर्वांनी साथ दिली. (Ajit Pawar Speech News) मला वाटतं केंद्रात ज्या पक्षाचे सरकार सत्तेवर असते, तोच पक्ष राज्यात सत्तेत असेल तर कामे होतात, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याच्या आपल्या निर्णयाचे समर्थन केले.

Ajit Pawar News
MP Imtiaz Jaleel On Adarsh Scams : मंत्रिमंडळावर मोर्चे निघाले सोळा; पण चर्चा `आदर्श`च्या ठेवीदारांचीच...

छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. देशाला मोदींशिवाय पर्याय नाही, असेही अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. उद्या मराठवाडा मुक्तीसंग्रामाला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यासाठी आपण आज मंत्रिमंडळाची बैठक घेतली. पावसाने जरा ओढ दिलीय, त्यामुळे थोडी काळजी वाटते. (NCP) पुढील काही दिवसांत पाऊस पडेल अशी अपेक्षा आहे.

अशा परिस्थितीमध्ये बेकारी हटवण्यासाठी राज्यात कारखानदारी आणण्याचा आपण प्रयत्न करतोय. दीड लाखांची नोकर भरती आपण लवकरच करतोय. (Marathwada) आम्ही आमच्या परीने काम करतोय, प्रश्नांची सोडवणूक झाली पाहिजे. वित्त विभाग माझ्याकडे आहे, त्यामुळे निधी द्यायला अडचण येवू देणार नाही. पण जे काम कराल ते दर्जेदार असले पाहिजे, आमच्याकडे कामाचा दर्जा चांगला असतो, कारण आम्ही पाहणी करतो.

परंतु सर्व ठिकाणी असं पाहायला मिळत नाही, याची खंत वाटते, असेही अजित पवार म्हणाले. आपल्याला इथे राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या वाढवायची आहे. नुसतं पद मिळाव, असं म्हणून चालत नाही तेवढे खासदार, आमदार निवडून आणावे लागतील. पक्षाला कमीपणा येईल, असं वर्तन कुणाकडूनही होऊ नये, असे आवाहनही अजित पवारांनी उपस्थितांना केले.

लोकसभेच्या निवडणुकीत तुमची ताकद कळू द्या, आपण लोकसभेला महायुतीचे उमेदवार देणार आहोत, तेव्हा तुमची ताकद लावा, लोकसभेला चांगलं यश मिळेल, असा प्रयत्न करूया, अशी सादही अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना घातली. लोकशाहीत बहुमताला किंमत आहे, आम्हीही बहुमताला मानतो. मोदींना पर्याय नाही, त्यांच्या माध्यमातून विकास काम करायची आहेत, असेही अजित पवार म्हणाले.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com