Imtiaz jaleel on Mahavikas Aghadi : 'महाविकास आघाडीला आम्ही प्रस्ताव पाठवला होता, हे सत्य मात्र..' ; इम्तियाज जलील यांचं विधान!

Imtiaz jaleel News : 'आम्ही मुंबईला जाणार आहे आम्हाला कोणी रोखू शकत नाही', असंही इम्तियाज जलील म्हणाले आहेत.
MP Imtiaz Jaleel News
MP Imtiaz Jaleel NewsSarkarnama
Published on
Updated on

Imtiaz jaleel Politics : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात नवनवीन घडामोडी घडत आहेत. राजकीय वातावरणही तापलेलं आहे. नेत्यांकडून पक्ष बदलाच्या हालचाली सुरू आहेत. तर सत्ताधारी आणि विरोधक आपल्या आघाड्या मजबूत करण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत. त्याचप्रमाणे राज्यातील अन्य पक्षही आपली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

याच पार्श्वभूमीवर एमआयएम पक्ष महाविकास आघाडीशी हात मिळवणी करणार असल्याचं बोललं जात होतं. त्यावर आता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

'महाविकास आघाडीला(Mahavikas Aghadi) आम्ही प्रस्ताव पाठवला होता, हे सत्य आहे मात्र त्यांच्याकडून अजून काहीही उत्तर आलेलं नाही. ते आल्यास आम्ही नक्की सांगू. असं म्हणत इम्तियाज जलील यांनी या मुद्य्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

MP Imtiaz Jaleel News
Mumbai University Senate Election: मुंबई विद्यापीठाची निवडणूक ठरल्याप्रमाणेच होणार ; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला झटका!

याशिवाय, आम्ही मुंबईला जाणार आहे आम्हाला कोणी रोखू शकत नाही. आम्ही कुठल्या पक्षाकडून नाही तर मुस्लिम समाजाच्या धर्मगुरूंना जी लोक बोलली त्यांच्या विरोधात कारवाई करावी. या मागणीसाठी मुंबईला जाणार आहोत. असं एमआयएम(MIM)चे प्रदेशाध्यक्ष आणि छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलेलं आहे.

तसेच, 'संभाजीनगर पोलिसांनी आम्हाला नोटीस देण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही शहरात काहीच करणार नाही, आम्ही मुंबईला जाऊन फक्त भेटणार असल्याचही त्यांनी सांगितलं. 23 तारखेला आम्ही मुंबईकडे मोठ्या संख्येने निघणार असल्याची माहिती त्यांनी दिली. रामगिरी महाराज आणि नितेश राणे(Nitesh Rane) यांनी जी विवादास्पद वक्तव्य केली आहेत. त्याच्या निषेधार्थ आम्ही मुंबईला मुख्यमंत्र्यांना जाऊन संविधानची प्रत भेट देणार आहोत.' असंही जलील यांनी सांगितलं आहे.

MP Imtiaz Jaleel News
Kumari Selja: हरियाणात 'खेला' होणार! ; काँग्रेसच्या कुमारी शैलजा भाजपमध्ये प्रवेश करणार?

याचबरोबर, 'धारावी मशिदीबाबत काहीही चुकीचं नव्हतं. यांना राज्यात दंगली करायच्या आहेत. वातावरण तापवायचा आहे त्यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू आहेत. असा आरोप इम्तियाज जलील यांनी केला आहे. तसेच ती लोक आम्हाला जातीवादी म्हणतात पण मी दहा वर्षे संभाजीनगरचा लोकप्रतिनिधी होतो. मी किंवा ओवेसी यांनी काय जातीयवादीपणा केलाय, कुठल्या धर्माबाबत बोललो आहे हे आम्हाला दाखवून द्यावं.' असं आव्हान इम्तियाज जलील यांनी दिलं आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com