Mp Imtiaz Jaleel News
Mp Imtiaz Jaleel NewsSarkarnama

Mp Imtiaz Jaleel Ready To Election : इम्तियाज जलील यांचा सर्वधर्मसमभाव; भेटीगाठी, धार्मिक कार्यक्रमांवर जोर...

AIMIM News : गणेशोत्सव, नवरात्र, दीपावली यांसारखे मोठे सण येणार आहेत. या प्रत्येक ठिकाणी इम्तियाज दिसले तर नवल वाटायला नको.
Published on

Aurangabad Political News : एमआयएमचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार इम्तियाज जलील यांच्याकडे जातीयवादी पक्षाचा खासदार म्हणून पाहिले जाते. (AIMIM News) २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत इम्तियाज यांनी शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत विजय मिळवला. अवघ्या पाच हजार मतांनी मिळालेला हा विजय असला तरी याची नोंद देशभरातील राजकीय पक्षांनी घेतली. आता पुन्हा छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून दिल्ली गाठण्याचा इम्तियाज यांचा निर्धार आहे.

Mp Imtiaz Jaleel News
Aurangabad District Bank : जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदासाठी शिंदे गटाच्या दोन मंत्र्यांमध्ये चुरस..

गेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे त्यांचा हा प्रवास सुकर झाला होता. मात्र, आता प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी एमआयएमसोबत नाही, शिवाय गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये एमआयएमला (AIMIM) नवा मित्रही शोधता आलेला नाही. त्यामुळे केवळ मुस्लिम मतांच्या जोरावर निवडून येता येणार नाही याची जाणीव इम्तियाज (Imtiaz Jaleel) व त्यांच्या समर्थकांना झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून इम्तियाज यांचे सोशल इंजिनिअरिंग जोरात सुरू झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

गेल्या दोन वर्षांत इम्तियाज यांनी नागरी प्रश्नांना हात घालत लोकांची सहानुभूती मिळवण्यात यश मिळवले आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे आदर्श नागरिक पतसंस्था घोटाळा उघडकीस आल्यानंतर ज्या पद्धतीने ते ठेवीदारांच्या बाजूने रस्त्यावर उतरले यातून त्यांना मोठा पाठिंबा येणाऱ्या निवडणुकीत मिळू शकतो. (Aurangabad) जिल्ह्यात सत्ताधारी पक्षाचे तीन मंत्री आणि केंद्रातील दोन अशा पाच मंत्र्यांचा लवाजमा असतानाही आदर्श पतसंस्था घोटाळा प्रकरणात इम्तियाज यांना ठेवीदारांनी आपला नेता म्हणून निवडणे मोठी गोष्ट म्हणावी लागेल.

इम्तियाज जलील यांनीदेखील या ठेवीदारांना पैसे मिळवून देण्यासाठी कुठलीही कसर सोडलेली नाही. पोलिस प्रशासन, सहकार विभाग, सत्ताधारी पक्षाचे आमदार, खासदार आणि मंत्र्यांना इम्तियाज यांनी अंगावर घेतले आहे. हे जरी असले तरी निवडणूक जिंकायची असेल, तर सर्वधर्मीयांचा पाठिंबा आवश्यक आहे, हे पत्रकार राहिलेल्या इम्तियाज जलील यांना वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यामुळेच त्यांनी आता सोशल इंजिनिअरिंगच्या दृष्टीने वाटचाल सुरू केली आहे.

इम्तियाज जलील पहिल्यांदाच रक्षाबंधन साजरा करताना दिसले. वैजापूर तालुक्यातील एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी होत त्यांनी आपल्या सर्वधर्मसमभावाची प्रचिती दिली. अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलकांची भेट आणि त्यांना पाठिंबा हादेखील त्यांच्या सोशल इंजिनिअरिंगचाच भाग होता. आगामी काळात गणेशोत्सव, नवरात्र, दीपावली यांसारखे मोठे सण येणार आहेत. तेव्हा या प्रत्येक ठिकाणी इम्तियाज जलील दिसले तर नवल वाटायला नको. इम्तियाज यांच्या या प्रयत्नांना किती यश मिळते? हे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईलच.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com