Imtiaz Jalil News : हिंदुत्ववादी संघटनांच्या इशाऱ्यानंतर 'एमआयएम'चं एक पाऊल मागं; इम्तियाज जलील यांचा कोल्हापूर दौरा रद्द; आता...

Imtiaz Jalil Kolhapur Tour Cancelled : विशाळगडावरील हिंसाचाराच्या घटनेनंतर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी, इम्तियाज जलील यांनी सरकार आणि संभाजीराजे छत्रपती, शाहूराजे छत्रपती यांच्यावर टीकेची झोड उठवली होती.
Asaduddin Owaisi, MP IMTIAZ JALIL
Asaduddin Owaisi, MP IMTIAZ JALILSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : विशाळगड अतिक्रमण हटवण्याच्या कारणावरून झालेला हिंसाचार आणि मशीदीची झालेली तोडफोड याचा निषेध करण्यासाठी एमआयएमचे (AIMIM) प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी थेट कोल्हापूरात येऊन मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. त्यानंतर कोल्हापूरातील हिंदुत्ववादी संघटनांनी इम्तियाज जलील व त्यांच्या पक्षाला कोल्हापूरी पायताण दाखवू, अशा इशारा दिला होता.

उद्या (ता.19) रोजी एमआयएमच्या वतीने कोल्हापूरमध्ये मोर्चा आणि निदर्शने करण्यात येणार होती. विशाळगडावरील हिंसाचाराच्या घटनेनंतर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी, इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी सरकार आणि संभाजीराजे छत्रपती, शाहूराजे छत्रपती यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. मोर्चा आणि निदर्शने करण्याची घोषणा केल्यापासून कोल्हापूरात एमआयएमच्या विरोधात संतापाचे वातावरण आहे.

हिंदुत्ववादी संघटनांनी इम्तियाज जलील यांनी कोल्हापुरात येऊन दाखवा त्यांचे पायताणाने स्वागत करू, असा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी इम्तियाज जलील यांना कोल्हापूरात न येण्याचे आवाहन केल्याचे समजते. दरम्यान, इम्तियाज जलील हे उद्या छत्रपती संभाजीनगर येथेच विशाळगडावरील हिंसाचार आणि मशीदीच्या तोडफोडीच्या घटनेचा निषेध म्हणून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करणार आहेत.

तसेच राज्यभरात विभागाच्या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयावर तर जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर ज्या त्या जिल्ह्यातील एमआयएमच्या पदाधिकारी, नेते, कार्यकर्त्यांनी आंदोलन करावे, असे आवाहन इम्तियाज जलील यांनी केले आहे. इम्तियाज जलील उद्या, कोल्हापूरला जाणार नसून संभाजीनगरातच त्यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली जाणार आहेत.

Asaduddin Owaisi, MP IMTIAZ JALIL
Uddhav Thackeray News : ठाकरे गटाचा दावा, आघाडीची धडधड वाढली; 'या' आमदारांसाठी धोक्याची घंटा

त्यामुळे उद्या, कोल्हापूरात स्थानिक एमआयएमचे नेते, पदाधिकारी, व कार्यकर्ते विशाळगड हिंसाचार व मशिदीच्या तोडफोडी विरोधात निदर्शने करणार आहेत. इम्तियाज जलील आधी कोल्हापूरात जाण्यावर ठाम होते, परंतु कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी त्यांना जाण्यापासून रोखण्याचे प्रयत्न सुरू केले होते. या प्रयत्नांना कुठेतरी यश आल्याचे दिसत आहे. उद्या (ता.19) शुक्रवारी दुपारची नमाज झाल्यानंतर राज्यभरात एमआयएमच्या वतीने निदर्शने केली जाणार आहेत.

Asaduddin Owaisi, MP IMTIAZ JALIL
Supriya Sule : भाजपची विधानसभेची तयारी; सुप्रिया सुळेंनी कळीच्या मुद्यावरच ठेवलं बोट, म्हणाल्या...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com