Uddhav Thackeray News : ठाकरे गटाचा दावा, आघाडीची धडधड वाढली; 'या' आमदारांसाठी धोक्याची घंटा

Assembly Election News : या दाव्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे टेन्शन येत्या काळात वाढणार आहे. या दोन्ही पक्षाच्या आमदारासाठी ही धोक्याची घंटा असणार आहे.
Uddhav Thackery, Sharad Pawar, Nana patole
Uddhav Thackery, Sharad Pawar, Nana patole Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशाने आघाडीचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढला आहे. या निवडणुकीत महायुती बॅकफुटला गेली आहे. त्यामुळे तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी सर्व पक्षांकडून सुरू करण्यात आली आहे. आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीचे मैदान मारण्यासाठी सर्वच पक्षाकडून जागांची चाचपणी आतापासूनच केली जात आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या एकमेकांच्या मतदारसंघावर दावे-प्रतिदावे केले जात आहेत. त्यामध्ये शिवसेनेच्या (Shivsena) ठाकरे गटाने मुंबईतील 36 पैकी 25 जागांवर दावा केला आहे. या दाव्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस (Congress) व राष्ट्रवादी काँग्रेसचे टेन्शन येत्या काळात वाढणार आहे. या दोन्ही पक्षाच्या आमदारासाठी ही धोक्याची घंटा असणार आहे.

मुंबईची ओळख गेल्या अनेक वर्षापासून ठाकरेंचा बालेकिल्ला अशीच राहिली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील 6 पैकी 3 जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे आता लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी मुंबई ठाकरे गटाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे.

येत्या काळात मुंबईतील एकूण 36 विधानसभा मतदारसंघांपैकी 25 जागांवर लढण्याची ठाकरे गटाची तयारी केली आहे. त्यामुळेच मुंबईतील बहुतांश विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्याची रणनीती ठाकरे गटाने आखली असल्याचे दिसते. विधानसभा निवडणुकीवेळीच महापालिका निवडणुकीची तयारी ठाकरे गटाकडून केली जात आहे.

मुंबईतील एकूण 36 विधानसभा मतदारसंघांपैकी सध्यस्थितीत शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे 8 आमदार आहेत तर शिवसेना शिंदे गटाचे 6 आमदार आहेत तर भाजपचे 8 आमदार आहेत. तर काँग्रेसचा 1 आमदार आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार आहे तर समाजवादी पक्षाचा एक आमदार आहे. त्यामुळे येत्या काळात शिवसेना ठाकरे गटाचा शिंदे गटाकडे असलेल्या सहा तर भाजपकडे असलेल्या 8 जागावर त्यांचे लक्ष्य असणार आहे. उर्वरित 11 मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाने मित्रपक्षांना सोडण्याची तयारी दर्शवली आहे.

Uddhav Thackery, Sharad Pawar, Nana patole
Video Uddhav Thackeray: पवार-पटोलेंना 'शॉक'; उद्धव ठाकरेंचा नवा डाव ; मित्रपक्षांच्या मतदारसंघावरच घाव

शिवसेना ठाकरे गट आमदार पुढीलप्रमाणे : वरळी : आदित्य ठाकरे, शिवडी : अजय चौधरी, कलिना: संजय पोतनीस, अंधेरी (पूर्व) : ऋतुजा लटके, दिंडोशी :सुनील प्रभू , चेंबूर: प्रकाश फातर्पेकर, विकोळी : सुनील राऊत, भांडूप (पूर्व) : रमेश कोरगावकर.

शिवसेना शिंदे गट आमदार पुढीलप्रमाणे : माहिम :सदा सरवणकर, भायखळा :यामिनी जाधव, मागाठणे: प्रकाश सुर्वे जोगेश्वरी सध्या रिक्त ( रवींद्र वायकर), कुर्ला: मंगेश कुडाळकर, चांदिवली : दिलीप लांडे.

भाजपचे आमदार पुढीलप्रमाणे वडाळा : कालिदास कोळंबकर, कुलाबा :राहुल नार्वेकर, मलबार हिल: मंगलप्रभात लोढा, दहिसर :मनिषा चौधरी, गोरेगाव: विद्या ठाकूर, वर्सोवा:भारती लवेकर, विलेपार्ले : पराग आळवणी. बोरिवली :सुनील राणे, मलबार हिल: मंगलप्रभात लोढा.

महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे आमदार पुढीलप्रमाणे : वांद्रे (पूर्व) : झिशान सिद्दीकी, काँग्रेस, मानखूर्द-शिवाजीनगर :अबु आझमी समाजवादी पार्टी, अणुशक्ती नगर : नवाब मलिक : राष्ट्रवादी काँग्रेस.

Uddhav Thackery, Sharad Pawar, Nana patole
Video Vijay Wadettiwar : विरोधी पक्षनेत्याच्या शासकीय निवासस्थानाला गळती, वडेट्टीवार सरकारवर बरसले...

ठाकरे गटाला हव्या आहेत 'या' जागा

2019 च्या विधानसभा निवडणुकीत 14 जागा शिवसेनेनं जिंकल्या होत्या, त्यातील आठ आमदार ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहेत. तर सहा आमदार शिंदेंच्या शिवसेनेसोबत आहेत. त्यामुळे मुंबईतील जिंकलेल्या जागा आणि ज्या ठिकाणी एकापेक्षा अधिक उमेदवार इच्छुक आहेत आणि जिथे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विधानसभा क्षेत्रात ठाकरेंचा उमेदवार असताना अधिक लीड प्राप्त आहे, अशा जागांचा ठाकरेंकडून निवडणूक लढवताना आग्रह केला जाऊ शकतो. तर मुंबईतील काही जागा जिथे ठाकरेंची ताकद आहे, तिथे शिवसेना ठाकरे गट महापालिका निवडणुकांचा विचार करून जागा लढवण्याचं नियोजन करत असल्याचे समजते.

शिंदे गट, भाजपच्या जागांवर ठाकरे गटाचा डोळा

येत्या काळात होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीत शिवसेना ठाकरे गटाकडून 36 पैकी कोणत्या 25 जागांवर दावा केला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेषता ठाकरे गटाचा दावा शिंदे गटाकडे असलेल्या जागांवर त्यासोबतच भाजपकडे असलेल्या जागांवर दावा करण्याची शक्यता अधिक आहे.

Uddhav Thackery, Sharad Pawar, Nana patole
Vilas Lande: भाचा अजित गव्हाणेसोबत मामा विलास लांडे यांची का झाली नाही शरद पवार राष्ट्रवादीत घरवापसी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com