Imtiaz Jalil : अखेरच्या क्षणी घरकुल योजनेच्या डिपीआरला मंजुरी, गरीबांचे स्वप्न साकार होणार..

विशेष बाब म्हणून दोन वर्षा करिता कार्यकाळ वाढवून देण्याची मागणी आपण २३ फेब्रुवारी रोजी पत्राव्दारे केली होती. या सगळ्या प्रयत्नांना आज यश मिळाले आहे. (Imtiaz Jalil)
Mp Imtiaz Jalil, Aurangabad
Mp Imtiaz Jalil, AurangabadSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : गरजु व गोरगरीब नागरीकांना रखडलेल्या पंतप्रधान आवास योजनेतुन हक्काचे घर मिळावे यासाठी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी महिनाभरापुर्वी प्रयत्न सुरू केले होते. राज्य सरकार, महापालिकेच्या उदासीनतेमुळे या योजनेसाठी जागा उपलब्ध न झाल्यामुळे गेल्या चार वर्षापासून ही योजना रखडली होती. (Aurangabad) इम्तियाज जलील यांनी पाठपुरावा कर केंद्राला विनंती केल्यांतर अखेर आज घरकुल योजनेच्या डीपीआरला केंद्राने मंजुरी दिली. (Gharkul Yojna)

आराखडा मंजुर झाल्यामुळे आता चाळीस हजार गोरगरिबांच्या घराचे स्वप्न पुर्ण होणार असल्याचा आपल्याला आनंद होत असल्याची प्रतिक्रिया इम्तियाज जलील यांनी दिली आहे. केंद्राच्या समितीने आज झालेल्या बैठकीत औरंगाबादेतील घरकुल योजनेच्या डीपीआरला मंजुरी दिल्याची माहिती खासदार इम्तियाज यांनी व्हिडिओच्या माध्यमातून देत लाभार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छाही दिल्या.

जनतेने ज्या अपेक्षेने आपल्याला निवडून दिले आहे, त्या अपेक्षा पुर्ण करण्यात आपण यशस्वी झालो आहोत, असेही ते म्हणाले. औरंगाबाद शहरातील घरकुल योजना रखडल्याचा मुद्दा सर्वप्रथम इम्तियाज जलील यांनी उपस्थितीत केला होता. परंतु राज्य सरकार आणि महापालिकेने या घरकुल योजनेसाठी जागाच उपलब्ध करून न दिल्यामुळे केंद्राने ही योजना गुंडाळली होती. ८० हजार लाभाधारकांपैकी केवळ ३५६ जणांनाच घर मिळाल्याचा मुद्दा इम्तियाज जलील यांनी लोकसभेत उपस्थीत केला होता.

गोरगरीबांना घरांचे स्वप्न दाखवून त्यांची फसवणूक मोदी सरकार करत असल्याचा आरोप करत त्यांनी कठोर भूमिका घेतली होती. केंद्रीय अर्बन डेव्हलपमेंट समितीच्या बैठकीत वारंवार हा मुद्दा उपस्थितीत केल्यानंतर राज्य सरकार व महापालिकेच्या हालचाली सुरू झाल्या. चार वर्षात झाले नाही, ते महिनाभरात घडले. राज्य शासनाने जागा दिली, महापालिकेने डीपीआर तयार करून राज्य सरकारला पाठवला. राज्याने तो मंजुर करून केंद्राकडे पाठवला आणि आज या डीपीआरला मंजुरी मिळाली.

Mp Imtiaz Jalil, Aurangabad
Raosaheb Danve : युपीत तुमचे दोनच आमदार, मग काॅंग्रेसचा पंतप्रधान कसा होणार?

घर मिळण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या नागरीकांना आता त्यांच्या स्वत:चे, हक्काचे घर लवकरच मिळणार असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले. केंद्रीय गृह निर्माण मंत्री हरदिप सिंग पुरी आणि अर्बन डेव्हलपमेंटचे सचिव मनोज जोशी यांची आज दिल्ली येथे भेट घेवून औरंगाबाद महानगरपालिकेने सादर केलेल्या डिपीआरला मंजुरी देण्याची विनंती केली होती. ३१ मार्च २०२२ ला योजनेची मुदत संपणार असल्याने त्या आधीच डीपीआरला मंजुरी मिळावी यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते.

विशेष बाब म्हणून दोन वर्षा करिता कार्यकाळ वाढवून देण्याची मागणी आपण २३ फेब्रुवारी रोजी पत्राव्दारे केली होती. या सगळ्या प्रयत्नांना आज यश मिळाले आहे, याचा मला अतिशय आनंद होत आहे. औरंगाबादकर आणि घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांचे मी अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देखील देतो, असे म्हणत इम्तियाज जलील यांनी आनंद व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com